शहरं
Join us  
Trending Stories
1
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
2
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! मुळात पडळकर हा विषय अत्यंत गंभीर...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
13
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
14
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
15
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
16
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
17
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

पीएमपीला ‘पंक्चर’चे ग्रहण

By admin | Updated: October 6, 2015 04:56 IST

बसमधील तांत्रिक समस्या आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खोलीचा अंदाज न आल्याने वाहने आदळण्यामुळे पीएमपीच्या बसला पावसाळ्यात

पुणे : बसमधील तांत्रिक समस्या आणि पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खोलीचा अंदाज न आल्याने वाहने आदळण्यामुळे पीएमपीच्या बसला पावसाळ्यात पंक्चरचे ग्रहण लागले आहे. गेल्या चार महिन्यांत बस पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले असून, दरदिवशी सरासरी ३० गाड्या मार्गावर पंक्चर झाल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. याशिवाय, हे पंक्चर काढणेही पीएमपीसाठी तोट्याचे ठरत असून, प्रतिपंक्चर सरासरी ५०० ते १ हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. हा खर्च पावसाळ्यात दरमहा ९ ते १० लाखांपर्यंत पोहोचला आहे. तर, गेल्या ९ महिन्यांत हा आकडा ५ हजार ९३ वर पोहोचला असून, त्यासाठी पीएमपीला तब्बल ५० लाखांहून अधिक खर्च करावा लागला आहे. या शिवाय संबंधित बसची फेरी रद्द झाल्याने कोट्यवधीच्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागले आहे. शहरात पीएमपीच्या दररोज सरासरी १४०० बस संचलनात असतात, अनेकदा वाहनांचे टायर खराब असल्याने अथवा रस्त्यांवर इतर काही समस्या आल्यास बस पंक्चर होतात. मात्र, हे प्रमाण दरमहा सरासरी ५०० च्या असापास असते. मात्र, या वर्षी पावसाळ्यात हे प्रमाण वाढले असून, हा आकडा दरमहा सरासरी ८०० च्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा होत असून, अनेक मार्गावर अचानक बस बंद पडल्यास काही फेऱ्या प्रशासनास रद्द कराव्या लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होतच आहे. शिवाय या पंक्चरसाठी मोठ्या प्रमाणावर खर्चाचा भारही पीएमपीला सहन करावा लागत आहे.महिनापंक्चरची संख्या जानेवारी ५७४फेब्रुवारी५०६मार्च६८०एप्रिल६७२मे५७२जून६५०जुलै६७५आॅगस्ट७२५सप्टेंबर८७४एकूण५०९३पंक्चर वाहनांमध्ये सीएनजी बसचे प्रमाण सर्वाधिक आहे. या वाहनांच्या चाकांमध्ये असलेल्या ब्रेकच्या सिस्टिममधील सदोष तांत्रिक यंत्रणेमुळे या बसच्या टायर पंक्चरचे प्रमाण अधिक असल्याने पीएमपीमधील अभियंत्यांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे यापुढे या गाड्यांच्या यंत्रणेबाबत तसेच इतर वाहनांसाठी रेडियल टायर वापरण्याबाबत प्रशासनाचा विचार सुरू असून, पंक्चरचे प्रमाण कमी करून पीएमपीचे आर्थिक नुकसान थांबविण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.