शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी प्रवाशांच्या तक्रारींची गंभीर दखल

By admin | Updated: November 23, 2015 00:57 IST

प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत

पुणे : प्रवासी वाढीबरोबरच पीएमपीचे उत्पन्न दररोज दीड कोटींच्यावर गेल्यानंतर आता पीएमपी अधिक प्रवासीकेंद्रित करण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याअंतर्गत प्रवाशांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच ही प्रणाली तयार होणार असल्याचे ते म्हणाले. प्रवाशांना चालक-वाहक तसेच इतर तक्रारी असल्यास या तक्रारींसाठी काही कार्यालयीन क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र, अनेकदा हे क्रमांक सुटीच्या दिवशी बंद असतात, तर अनेकदा तक्रारी करण्यात येणारे दूरध्वनीच बंद असतात, यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीने केलेली तक्रार कोणाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली. त्याचे पुढे काय झाले, याची कोणतीही माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला नसते, तर आपल्या तक्रारीच पुढे काय झाले, याची साधी कल्पनाही प्रवाशांना दिली जात नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीचा गांभीर्याने सोडविण्यासाठी पीएमपीकडून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. याबाबत माहिती देताना कृष्णा म्हणाले, की पीएमपी प्रवाशांच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. या तक्रारींच्या माध्यमातून दैनंदिन संचलन आणि अधिकाधिक प्रवासीकेंद्रित सेवा सुरू करणे शक्य आहे. मात्र, अस्तित्वातील प्रणाली परिणामकारक नसल्याने लवकरच नवीन प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन अ‍ॅप्सही विकसित करण्यात येणार आहे. यासाठी संगणकप्रणाली विकसित करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही कृष्णा यांनी स्पष्ट केले.