लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दिल्लीत सलग ८२ दिवस सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत वाईट शब्दांत टीका करत आहेत. यावरून ते असंवेदनशील असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका करत काँग्रेस पक्षाने आंदाेलन केले.
काँग्रेसच्या कसबा विधानसभा मतदारसंघ शाखेच्या वतीने मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यासमोर आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून धरणे धरले. बागवे यांनी मोदी सरकार देशातील गरीब जनतेला वाऱ्यावर सोडून मोदी सरकार मूठभर भांडवलदारांसाठी काम करत असल्याची टीका केली.
प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, कसबा ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, सचिन आडेकर, अॅड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अरविंद शिंदे, रवींद्र धंगेकर, नीताताई परदेशी, सोनाली मारण व पक्षाचे कसबा ब्लॉकमधील पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.