शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपी प्रवाशांवर भाडेवाढीची कु-हाड?

By admin | Updated: May 21, 2014 01:23 IST

डिझेल-सीएनजीची दरवाढ, स्पेअर पार्टचा अभाव, अधिकारी- कर्मचार्‍यांची वेतन व महागाई भत्तावाढ यामुळे पीएमपी प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता आहे.

पुणे : डिझेल-सीएनजीची दरवाढ, स्पेअर पार्टचा अभाव, अधिकारी- कर्मचार्‍यांची वेतन व महागाई भत्तावाढ यामुळे पीएमपी प्रवाशांच्या तिकीटदरात वाढ होण्याची शक्यता आहे. पीएमपीला सध्या दररोज सुमारे ४० लाख रुपयांचा तोटा होत असून, तोटा भरून काढण्याकरिता संचालक मंडळासमोर प्रशासनातर्फे दरवाढ सुचविण्यात आली आहे. स्वारगेट येथील पीएमपी मुख्यालयात बुधवारी (दि. २१) संचालक मंडळाची बैठक होणार आहे. त्यामध्ये भाडेदरवाढीवर निर्णय घेतला जाणार आहे. मार्च २०१३ मध्ये तिकीट दरवाढ करण्यात आली होती. सध्या सुचविलेल्या प्रस्तावानुसार प्राथमिक तिकीटदर ५ रुपये कायम ठेवण्यात येत आहे. तर पुढील टप्प्यांसाठी किलोमीटरप्रमाणे ५ रुपयांची भाडेवाढ सुचविण्यात आली आहे. भाडेवाढ केल्यास सुमारे ३० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून, तरीही १० लाख रुपयांचा तोटा कायम राहणार आहे. संचालक मंडळाच्या संमतीनंतर भाडेवाढीचा प्रस्ताव जिल्हा परिवहन प्राधिकरणाला सादर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी बदली धोरणानुसार परिवहन महामंडळाकडील अधिकार्‍यांच्या बदल्या करून नियुक्त्या करण्याचे धोरण पुन्हा ठेवण्यात येत आहे. दररोज रस्त्यावर धावणार्‍या बसच्या संख्येत स्पेअर पार्टअभावी घट होत आहे. परंतु कामगारांच्या फरकाच्या रकमेकरिता मात्र प्रशासनाकडून अट्टहास धरला जात आहे. त्यामुळे सुधारित वेतनश्रेणीनुसार १ एप्रिल २००७ ते ३० नोव्हेंबर २०११ या कालावधीतील ५६ महिन्यांच्या थकीत फरकाची रक्कम ‘खास बाब’ म्हणून महाराष्ट्र शासनाकडे मागणी करण्याबाबत बैठकीत निर्णय घेतला जाईल.