शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

पीएमपी घेतेय महिन्याला दोन बळी

By admin | Updated: March 18, 2015 00:34 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा सर्वसामान्यांसाठी वरदान असली तरी हीच सेवा दर महिन्याला दोन पुणेकरांचा जीव घेत आहे.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा सर्वसामान्यांसाठी वरदान असली तरी हीच सेवा दर महिन्याला दोन पुणेकरांचा जीव घेत आहे. मागील वर्षभरात झालेल्या ९२ अपघातांमध्ये पीएमपीने एकूण २५ जणांचा बळी घेतला असून, ४३ जणांना गंभीररीत्या जखमी केले आहे. मागील तीन महिन्यांपासून पीएमपीची सेवा सुधारत असली तरी अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. कात्रज बसस्थानकात सोमवारी झालेल्या अपघातात बहीण-भावाचा बळी गेला. त्यामुळे पुन्हा एकदा पीएमपी अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मागील तीन महिन्यांपासून पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. बसेसची रंगरंगोटी, दुरुस्तीची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत मार्गावरील नियमित बसेसची संख्या सुमारे ३५०ने वाढली आहे. मात्र, असे असले तरी पीएमपी प्रशासन अपघात रोखण्यास कमी पडत आहे. प्रशासनाने दिलेल्या अपघातविषयक आकडेवारीनुसार मागील वर्षभरात दर महिन्याला सरासरी ७ अपघात झाले असून त्यात दोघांचा बळी गेला आहे.वर्षभरात एप्रिलपासून सर्वाधिक १३ अपघात मे महिन्यात झाले आहेत. त्यात ४ जणांचा बळी गेला असून, ५ गंभीररीत्या जखमी झाले, तर ९ जण किरकोळ जखमी झाले. आॅक्टोबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातांत एकही बळी गेला नाही. मात्र गंभीर व किरकोळ जखमींची संख्या सरासरीएवढीच आहे. या अपघातांमध्ये चालकांच्या निष्काळजीपणाबरोबरच बसमधील तांत्रिक बिघाडही तितक्याच प्रमाणात कारणीभूत आहेत. त्यामध्येही बे्रक फेल झाल्याने अनेक अपघात घडले आहेत. अनेकदा बसचालक वेळेत पोहोचण्यासाठी बस वेगाने चालवितात. त्यामुळेही अपघात घडले आहेत. धोकादायकपणे ओव्हरटेक करणे, सिग्नल न पाळणे, प्रवासी चढ-उतार करीत असतानाच बस पुढे नेणे अशा प्रकारांमुळेही अपघात घडले आहेत. बसस्थानके व थांब्यांचे सेफ्टी आॅडिट करावेकात्रज बसस्थानकाप्रमाणे पीएमपीचे अनेक बसस्थानके व थांबे जीवघेणे झाले आहेत. प्रवासी सुरक्षेच्यादृष्टीने त्यांचे सेफ्टी आॅडिट करण्याची गरज आहे. स्थानकांची रचना, बस व प्रवासी ये-जा, तसेच अन्य वाहतुकीबाबत तज्ज्ञांकडून कालबद्ध आॅडिट करून दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचचे अध्यक्ष जुगल राठी यांनी जिल्हाधिकारी व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष सौरव राव यांच्याकडे केली आहे.पीएमपीच्या ताफ्यातील एकूण १४३० बसेसपैकी ३६६ बस ९ वर्षांपुढील आहेत. त्यापैकी २३२ बस ११ वर्षांपुढील आहेत. मागील महिन्यातच पीएमपीने १२ बस सेवेतून काढून टाकल्या आहेत. तसेच ११ वर्षांपुढील बसेसचा वापरही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे या बस खिळखिळ्या झाल्या आहेत. परिणामी अधून-मधून या बसेसचा बिघाड होतच असतो. चालकांना या बसेस घेऊनच मार्गावर यावे लागत आहे. सातत्याने दुरुस्ती करून या बसेस मार्गावर आणल्या जात आहेत. यातील काही बसेसच्या खिडक्यांना काचा नसतात. आॅईल गळती होत असते. बसचा ढाचा खिळखिळा झालेला असतो. ठिकठिकाणी पत्रे उचकटलेले दिसतात. अशा अवस्थेतच या बसमार्गावर येत असल्याने प्रवाशांनाही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मात्र, सध्या जास्तीतजास्त बस मार्गावर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याने या बसेस किरकोळ दुरुस्ती करून मार्गावर आणल्या जात आहेत. ४कात्रज बसस्थानकामध्ये झालेला बस अपघात बसचालकाच्या चुकीमुळेच झाला असून, बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, अशी माहिती मुख्य अभियंता कैलास गावडे यांनी दिली. चालक बसमध्ये गेल्यानंतर त्याने थेट हँड ब्रेक काढला. त्यातच बस उताराला उभी असल्याने आपोआप पुढे जाऊ लागली.४या वेळी काही प्रवासी बसच्या मागून धावत येत बसच्या पुढे आले. चालकाने बे्रक लावण्याचा प्रयत्न केला; मात्र एअर टँकमध्ये पुरेशी हवा नसल्याने ब्रेक लागला नाही. परिणामी दोन प्रवासी बसच्या चाकाखाली आले. ४बसचा वेग कमी होता त्यामुळे काही प्रवाशांनीच हाताने ही बस थांबविली. चालकाने बसमध्ये चढल्यानंतर हँड ब्रेक काढण्यापूर्वी एअरचे प्रमाण तपासणे आवश्यक होते. मात्र तसे न करता त्याने थेट हँड बे्रक काढला. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे गावडे यांनी सांगितले.पीएमपी ताफ्यातील बसेसचे वयोमान (भाडेतत्त्वावरील बस वगळून)१ ते ५ वर्षे - ५२२६ ते ८ वर्षे - ५४२९ ते १० वर्षे - १३४११ ते १५ वर्षे - २३२मोठा बिघाड होऊन रस्त्यात बंद पडणाऱ्या बसेसची सरासरी संख्यामहिनाबस संख्याजानेवारी३२फेबु्रवारी३९दि. १० मार्चपर्यंत२२दररोज पडतात १०० बस बंद४ जास्तीतजास्त बस मार्गावर आणण्यासाठी अनेक दिवसांपासून बंद असलेल्या बस दुरुस्त करून मार्गावर आणल्या जात आहेत. मात्र, त्यामुळे दररोज सरासरी १०० बस रस्त्यातच बंद पडत आहेत. सरासरी ३० बस जागेवर दुरुस्त होत नाहीत. मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांना ओढत आगारात आणावे लागते. ब्रेकफेल होणाऱ्या बसेसची संख्या जास्त आहे. गिअर, क्लच, इंजिन, ट्रान्समिशन लाईन नादुरुस्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यासह आॅईल लिकेज, पंक्चर, स्टार्टर बिघाड, स्टेअरिंग जॅम होणे असे बिघाड होतात. ४शहरात ब्रेक व क्लच वापरण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते नादुरुस्त होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच उन्हामुळे आॅईल ओव्हरहिटींगचे प्रमाणही जास्त असते, अशी माहिती पीएमपीचे मुख्य अभियंता कैलास गावडे यांनी दिली. ४अपघात रोखण्यासाठी पीएमपीमार्फत चालकांना विविध प्रकारे प्रशिक्षित केले जाते. तसेच त्यांना योगासने व प्राणायामचे धडेही दिले जातात. रिफे्रश चालक या प्रशिक्षण प्रकारांतर्गत जुन्या चालकांना पुन्हा नव्याने प्रशिक्षण दिले जाते. भाडेतत्त्वारील चालकांनाही पीएमपीमार्फत बस चालविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. चालकांचे मनोधैर्य उंचावे, शारीरिकदृष्ट्या त्यांनी सक्षम राहावे यासाठी त्यांना योगासन व प्राणायामचे धडे दिले जातात. फेबु्रवारी २०१३ पासून दोन वर्षांत सुमारे ४५०० चालकांना हे धडे देण्यात आले आहेत. डिझेल बचत, सुरक्षित ड्रायव्हिंग या उपक्रमांतर्गत २७३० चालक प्रशिक्षित करण्यात आले, तर सेम्युलेटर या प्रकारांतर्गत २६३९ चालकांना प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती पीएमपीच्या अपघात विभागामार्फत देण्यात आली.प्रत्येक वेळी चालकाची नसते चूक४प्रत्येक अपघातामध्ये केवळ चालकाचीच चूक असत नाही. काही अपघात हे चालकाच्या निष्काळजीपणामुळे घडतात. मात्र काही अपघातांमध्ये नागरिकांची चूक निदर्शनास आली आहे. विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, चालत्या बसमध्ये चढ-उतार करणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, बसच्या मागील बाजूला धडकणे, इतर चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटणे, यामुळेही अपघात घडले आहेत. वास्तविक या बसचालकाची काहीच चूक नसते, असे पीएमपी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, असे म्हणून प्रशासन हात झटकत नाही. अपघात झालेल्या बस चालकावर तीव्रतेनुसार कारवाई केलीच जाते. दि. १ एप्रिल २०१४ ते दि. १६ मार्च २०१५ मधील पीएमपी अपघातांची संख्या महिनाअपघातमृत्यूगंभीर जखमीकिरकोळ जखमीजुलै १४९३७२आॅगस्ट १४७३३४सप्टेंबर १४११३५४आॅक्टो. १४६०३७नोव्हें. १४३११४डिसें. १४७०६११जाने. १५७०४३फेबु्र. १५९४१९मार्च १५२३१२एकूण ६११७३२४६