शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

मुतखडा, पोटाच्या विकाराने ग्रामस्थ त्रस्त!

By admin | Updated: May 27, 2014 07:11 IST

कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे सरदवाडी, फलकेमळा, नवलेमळा, सरोदेवस्ती आदी भागांतील नागरिकांना मुतखडा आजाराला सामोरे जावे लागले.

प्रवीण गायकवाड, शिरूर - औद्योगिकीकरणाच्या विकासाची फळे चाखायला मिळण्याऐवजी कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे सरदवाडी, फलकेमळा, नवलेमळा, सरोदेवस्ती आदी भागांतील नागरिकांना मुतखडा आजाराला सामोरे जावे लागले. तर आजही अनेक नागरिकांना पोटाचे विकार सुरूच असल्याचे चित्र आहे. काही करा हे दूषित पाणी आपल्या ओढ्याला येण्याचे बंद करा, अशी विनवणी या गावातील महिला सत्ताधार्‍यांकडे करीत आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी दूषित झाल्याने या गावातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तर काही ठिकाणी पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे. हा त्रास कमी म्हणून की काय शारीरिक व्याधींनीही या गावच्या नागरिकांना जखडले आहे. यांपैकी बहुतांशी गावांतील नागरिकांना मुतखड्याच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. याबरोबरच पोटात दुखणे, मळमळणे, ताप, उलट्या आदी प्रकारचे विकारही या नागरिकांना जडले, आजही अनेकांना या विकाराला सामोरे जावे लागत आहे. फलकेमळा येथील नर्मदा फलके या महिलेला मुतखड्याचा आजार जडल्याने प्रचंड त्रास झाला, मुतखड्याची शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या गावाला पिण्यासाठी एमआयडीसीकडून पाणी मिळते. मात्र जुनी माणसे आजही विहिरींचेच पाणी पिण्यासाठी वापरतात. याचा परिणाम आजार बळावतोय. दूषित पाण्यामळे गावातील अनेक जनावरे दगावली आहेत. या पाण्यामुळे महिलावर्ग नाराज असून तुम्हाला निवडून दिले, या पाण्याचा बंदोबस्त करा नाहीतर कोणाला भेटून सांगायचे ते सांगा, असे आम्हाला सतत बजावत असल्याचे फलके यांनी सांगितले. ग्रामपंचायत सदस्या रोहिणी फलके यांनीही यास दुजोरा दिला. महिला बचत गटाच्या महिला आंदोलन करून हा प्रश्न सोडवू या निर्णयाप्रत आल्याचेही फलके यांनी सांगितले. याबाबत द्वारकाबाई फलके, सदाशिव नवले, सुनीता नवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. एमआयडीसी प्रशासनाने या कारखान्यांच्या दूषित पाण्याची दखल घेणे गरजेचे आहे. मात्र, त्यांचाही शुद्धीकरण प्रकल्प बंद असून त्यांच्याकडे आलेले दूषित पाणी (कारखान्यांचे) तेच आहे, तसेच ओढ्यात सोडत आहेत.