शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आॅप्शन फॉर्म भरा गुरुवारपासून

By admin | Updated: June 17, 2014 02:14 IST

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा येत्या गुरुवारपासून (दि.१९) सुरू होणार आहे

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा येत्या गुरुवारपासून (दि.१९) सुरू होणार आहे. दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर दोन दिवसांनंतर कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करण्यासाठी विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज (आॅप्शन फॉर्म) भरू शकतात. आॅनलाईन अर्जात भरलेल्या पसंतीक्रमानुसाराच विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता बिनचूकपणे अर्ज भरावा, असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील प्रवेश गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय प्रवेशपद्धतीने केले जात होते. परंतु, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने २0१४-१५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश आॅनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहावीच्या परीक्षा संपल्यानंतर शहरातील शाळांमार्फत अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरून घेतली गेली, तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे या संदर्भातील आॅप्शन फॉर्म संबंधित शाळांमधून भरून घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्वत:हून आॅप्शन फॉर्म भरण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे म्हणाल्या ,दहावीची परीक्षा संपल्यानंतर काही दिवसांतच अकरावी आॅनालाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी विद्यार्थ्यांना माहितिपुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली. तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावीच्या ६७ हजार ६६५ जागांवर विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने प्रवेश दिले जाणार असून आत्तापर्यंत ६२ हजार ३९२ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रवेश अर्ज भरला आहे.(प्रतिनिधी)