शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित पन्हाळा आणि वाई महोत्सव लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नियोजित वाई आणि पन्हाळा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे नियोजित वाई आणि पन्हाळा महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध २० ठिकाणी पर्यटन महोत्सवांचे आयोजन केले आहे. पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे महोत्सव आयोजित केले आहेत. या महोत्सवाअंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर पर्यटन विकास संस्था, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, ग्रामविकास आणि स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने जुन्नरमध्ये नुकताच द्राक्ष महोत्सव आयोजित केला होता.

त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये वाई आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा महोत्सव नगरपालिकेच्या साहाय्याने २६, २७, २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केले होते. मात्र, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही महोत्सव पुढे ढकलले आहेत.

.....

वाढत्या कोरोनामुळे पर्यटनाचा खोळंबा नाही

एमटीडीसीच्या पुणे विभागातील सर्व रिसॉर्टमध्ये पर्यटकांसमोरच खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून दिले जाते. पर्यटकांच्या प्रवासाचा इतिहास, वैद्यकीय पार्श्वभूमी जाणून घेतली जाते. तपासण्या केल्या जातात. कर्मचाऱ्यांचीही नियमित कोरोना चाचणी केली जाते. त्यामुळे पर्यटकांना विश्वास वाटतो. पुणे विभागात महाबळेश्वर, माळशेज घाट, माथेरान, पानशेत, कार्ला, कोयनानगर या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये ९० टक्के बुकिंग होत आहे, तर भीमाशंकरमधील रिसॉर्टचे बुकिंग ६० ते ७० टक्के आहे. सिंहगड आणि अक्कलकोट या ठिकाणी दोन नवे रिसॉर्ट सुरू होत आहेत.

- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, पुणे विभाग, एमटीडीसी