शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आराखडा

By admin | Updated: October 14, 2015 03:25 IST

पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार आज प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर नित्याचीच होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशानुसार आज प्रांताधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी कोरेगाव भीमा, सणसवाडी व शिक्रापूर या ठिकाणी पाहणी करून, ठोस कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. वाहतूककोंडी होणाऱ्या प्रत्येक चौकामध्ये तत्काळ ‘नो-पार्किंग’ झोन तयार करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.कोरेगाव भीमा येथे पुणे-नगर महामार्गाची पाहणी करण्यासाठी आज सकाळी प्रांताधिकारी सोनाप्पा यमगर, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी संजय चिल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक एम. आर. पाटील, बाजारपिके समितीचे संचालक राहुल गवारे, उद्योजक जयेश शिंदे, सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच नितीन गव्हाणे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. पुणे-नगर महामार्गावर सातत्याने वाहतुकीस होणाऱ्या अडथळ्यांमुळे सतत होणारी वाहतूककोंडीमुळे प्रवासी, नागरिक, शेतकरी, कामगार, उद्योजक, विद्यार्थी व रुग्ण यांसह सर्वच जण त्रस्त आहेत. याबाबत सातत्याने येणाऱ्या तक्रारींमुळे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दि.९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संबंधित अधिकारी व स्थानिक पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली होती. यापिके वेळी जिल्हाधिकारी राव यांनी या वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा करून ठोस कृती आराखडा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सकाळी कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर याठिकाणी प्रांताधिकारी सोनाप्पा यमगर यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी तसेच स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा केली. त्यानुसार कोरेगाव भीमामध्ये महामार्गालगतचा पदपथ काढणे व इतर अडथळे दूर करण्याबरोबरच ‘नो-पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई करणे, रोज दुपारी ३ ते ७ या वेळेत मुख्य चौकातील दुभाजक बंद करणे, बेशिस्तपणे रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांसाठी नजीकच्या काळात दुभाजकांवर लोखंडी बॅरिगेट उभारणे, तसेच गुरुवारच्या आठवडे बाजाराचेही योग्य नियोजन करण्यात येणार आहे. (वार्ताहर)