शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

खड्डा ठरतोय जीवघेणा

By admin | Updated: May 28, 2014 00:30 IST

पंचाळे बुद्रुक (ता. आंबेगाव) या गावाजवळील रस्त्यावर मधोमध पडलेला खड्डा या रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे

डिंभे : पंचाळे बुद्रुक (ता. आंबेगाव) या गावाजवळील रस्त्यावर मधोमध पडलेला खड्डा या रस्त्यावरून वाहतूक करणार्‍या प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. जवळपास वर्षभरापासून हा खड्डा आहे त्या स्थितीत असून, या खड्ड्यामुळे येथे लहान-मोठे अपघात झाले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील अडिवरेकडे जाणा-या रस्त्यावर पंचाळे बुद्रुक हे गाव लागते. या गावाला वळसा देताच पहिल्याच वळणावर रस्त्याच्या मधोमध एक भलामोठा खड्डा पडलेला आहे. हा खड्डा जवळपास वर्षभरापासून पडला असूनही पावसाळ्यानंतर रस्त्याची डागडुजी करणा-या बांधकाम विभागाच्या पथकास दिसला कसा नाही? आणि दिसला असेल तर तो यापुर्वीच भरून का घेतला गेला नाही? हाच प्रश्न या रस्त्यावरून येणा-या जाणा-या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होत आहे. अडिवरे ही या भागातील आठवड्याची बाजारपेठ आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रही याच गावात असल्याने या रस्त्यावर ब-यापैकी वाहनांची ये-जा असते. रात्रीच्या वेळी तर हा खड्डाच दिसत नसल्याने दुचाकी घसरून पडल्याने अपघातही घडले आहेत. हा खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)