शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडकरांच्या पैशाची उधळपट्टी

By admin | Updated: September 16, 2015 02:32 IST

पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे एका नगरसेविकेसह युरोपमधील स्पेन देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, तर वृक्ष प्राधिकरण समितीतील १३ नगरसेवक या महिनाअखेरीस दक्षिण

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे एका नगरसेविकेसह युरोपमधील स्पेन देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत, तर वृक्ष प्राधिकरण समितीतील १३ नगरसेवक या महिनाअखेरीस दक्षिण भारताच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत. स्थायी समितीने दौऱ्यासाठी सुमारे साडेसहा लाखांच्या खर्चाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला मंगळवारी मान्यता दिली. मात्र, पिंपरी-चिंचवडकरांच्या पैशातून दौरे करण्याऐवजी स्वखर्चातून दौरे करावेत, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थायी समिती सभापती अतुल शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. महापौर धराडे तीन महिन्यांपूर्वीच जपान दौऱ्यावर गेल्या होत्या. यास तीन महिने पूर्ण होत नाहीत, तोच आता युरोपमधील स्पेन देशाच्या दौऱ्यावर निघाल्या आहेत. स्पेनमधील बर्सिलोना शहरात ‘स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१५’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी धराडे १७ ते १९ नोव्हेंबर या दरम्यान स्पेनला जाणार आहेत. त्यांच्यासोबत स्थायी समितीच्या सदस्या सविता साळुंके या असणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचा केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश नसताना महापौर ‘स्मार्ट सिटी’ विषयावर आयोजित परिषदेला उपस्थिती लावणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या दौऱ्यासाठी येणाऱ्या खर्चाला स्थायी समितीच्या सभेत मंगळवारी ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे मंजुरी देण्यात आली. यासह वृक्ष प्राधिकरण समितीच्या तेरा नगरसेवकांसाठीही दक्षिण भारत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हे नगरसेवक २८ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या दरम्यान हा अभ्यास दौरा करणार आहेत. यासाठी येणाऱ्या खर्चालाही स्थायी समितीने ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे मंगळवारी मंजुरी दिली आहे. अशा पध्दतीने नागरिकांच्या पैशातून विकासकामे करण्याऐवजी दौऱ्यावर उधळपट्टी करणे चुकीचे आहे. त्याऐवजी महापौर व नगरसेवकांनी स्वखर्चातून अभ्यास दौरे करावेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) विविध विकासकामांसाठी साडेपाच कोटी खर्चास मान्यता पिंपरी : विविध विकासविषयक कामांसाठी येणाऱ्या सुमारे ५ कोटी ४० लाख रुपयांच्या खर्चास मंगळवारी स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. निगडी ते दापोडी रस्त्यावर स्थापत्यविषयक कामे करणे, प्रभाग क्र.५०, ५१ मध्ये अंतर्गत रस्ते तसेच विकास आराखड्यातील उर्वरित रस्ते हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. २४ मधील श्रीधरनगर, माणिक कॉलनी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ५३ वाकड ते इडन सोसायटीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. ५३ वाकड स्पेसिया हौसिंग सोसायटी, साई ओझोन, वर्व सोसायटीपर्यंतचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी येणाऱ्या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली. यासह प्रभाग क्र. ४७ मध्ये जोतिबानगर, काळेवाडी गावठाण येथील जलनि:सारण नलिकांची सुधारणा करणे, वॉर्ड क्र. ४८ मध्ये श्रीनगर, तापकीरनगर मधील जलनि:सारणविषयक सुधारकामे करणे, ड क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग क्रमांक ४३, ४४, ४६, ४७ मधील डे्रनेज लाईन व चेंबर्सची देखभाल व दुरुस्ती करणे यासाठी येणाऱ्या खर्चासही या बैठकीत मान्यता देण्यात आली.