लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एम.फिल.व पीएच.डी.ची प्रवेश प्रकिया येत्या बुधवारपासून (२६ जुलै) सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे १० सप्टेबर रोजी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेतील गुणांच्या व मुलाखतीच्या आधारे गुणवत्ता यादी प्रसिध्द करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. याबाबतचे परिपत्रक लवरकच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले जाईल.विद्यापीठ अनुदान आयोगाने पीएच.डी. प्रवेशाबाबत नवीन नियमावली प्रसिध्द केली होती. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आवश्यक बाबींची पूर्तता करून विद्यापीठाच्या पीएच.डी. व एम.फिल. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक तयार केले आहे. विद्यार्थ्यांना येत्या २६ जुलैपासून १४ आॅगस्टपर्यंत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून एम. फिल व पीएच.डी च्या प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील. पीएच.डी.च्या २ हजार ३५ जागांसाठी तर एम.फिल.च्या 265 जागांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे.प्रवेशास पात्र असणा-या विद्यार्थ्यांची १०० गुणांची प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाईल. परीक्षेत संशोधन पध्दतीवर ५० गुणांचे प्रश्न व संबंधित विद्यार्थ्याच्या विषयावर ५० गुणांचे प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न एक गुणांचा असेल परीक्षेत ‘निगेटिव्ह मार्किंग’ पध्दती असणार नाही. पीएच.डीच्या रिक्त जागा विद्याशाखा रिक्त जागा विज्ञान ८७०अभियांत्रिकी४४५औषधनिर्माणशास्त्र२००वाणिज्य१५०कला व ललीत कला१६०सामाजिक शास्त्र९५विधी३०शिक्षणशास्त्र८०शारिरिक शिक्षण ०५एम.फिल.च्या रिक्त जागा विद्याशाखा रिक्त जागा विज्ञान १२०वाणिज्य५०कला व ललीत कला४०सामाजिक शास्त्र३५शिक्षणशास्त्र२०
पीएच.डी. प्रवेशप्रक्रिया बुधवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 03:09 IST