शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते हस्तांतरणाविरोधात याचिका

By admin | Updated: May 8, 2017 03:36 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत ५०० मीटर परिसरात दारूविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही रस्ते स्थानिक स्वराज्य संस्थांकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही पळवाट असून त्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंंनिस) आणि महाराष्ट्र नशाबंदी मंडळ न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले.अंनिस आणि नशाबंदी मंडळाच्या वतीने ‘नशामुक्त महाराष्ट्र’ ही मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात धोरण आणि कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी रविवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारक कार्यालयात झालेल्या या बैठकीस अंनिसचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोळकर, मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, माधव बावगे, सुशीला मुंडे, प्रशांत पोतदार, अ‍ॅड. रंजना गवांदे यांच्यासह व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. पाटील म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या ५०० मीटर संदर्भातील निकालानंतर त्यामध्ये पळवाटा काढण्याचा चालू असलेला प्रयत्न अत्यंत चुकीचा आहे. त्याला रोखण्याची गरज आहे. यांदर्भात बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. अनेकांनी राज्य शासनाविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार अंनिस व नशाबंदी मंडळ ही याचिका दाखल करेल. तसेच दिवसभर चाललेल्या या बैठकीत तीन सत्रांमध्ये महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी धोरण तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अधिकाधिक लोकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी दि. १५ जूनपर्यंत विभागनिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.