शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र आईकडून छळ, लहान मुलीच्या सर्तकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोंढव्यातील एका ८ वर्षांच्या मुलीचा तिची सावत्र आई छळ करीत होती. तिला जेवायला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोंढव्यातील एका ८ वर्षांच्या मुलीचा तिची सावत्र आई छळ करीत होती. तिला जेवायला न देता मारहाण करून हकलून दिले होते. त्यामुळे ती बाहेर फिरत होती. रात्रीच्या वेळी तिने एका घरात पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा घरातील माउलीने तिची चौकशी केल्यावर सावत्र आई छळ करीत असल्याचे समजले. या वेळी या माउलीची लहान मुलगी तेथेच होती. तिला चाइल्ड हेल्पलाईनचा नंबर माहिती होता. तिने दुसर्‍या दिवशी चाइल्ड हेल्पलाईनला फोन करून या मुलीची माहिती दिली.

हा कॉल पुण्यातील ज्ञानदेवी चाइल्ड हेल्पलाईनकडे आला. त्यांनी कोंढवा पोलिसांच्या मदतीने भाग्योदयनगर येथील या मुलीचे घर शोधून काढले. तिच्या आई-वडिलांना विचारणा केली. पण, ही मुलगी सावत्र आईच्या त्रासाला इतकी कंटाळली होती. तिने त्यांच्याबरोबर राहण्यास नकार दिला. मुलीला सुरक्षितपणे ठेवण्यात आले आहे. अर्पणा मोडक यांच्या फिर्यादीवरून कोंढवा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दुसर्‍या एका घटनेत सावत्र वडिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावत्र वडिलांकडून ११ वर्षांच्या मुलीला आंब्याच्या पेटीच्या फळीने मारहाण करून तिला जखमी केल्याचे फोटो एका नागरिकांने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या ट्वीटर अकाऊंटवर टाकण्यात आले होते. पोलीस आयुक्तांनी त्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते. आहिलखान हा गेल्या ६ महिन्यांपासून आपल्या सावत्र मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत होता. वेळोवेळी जेवण न देता उपाशी ठेवत होता. दोन्ही घटनांमध्ये ज्युवेनाईल जस्टीस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

..........

१०९८

अल्पवयीन मुलांचा छळ होत असेल. त्यांना कामाला जुंपले जात असेल तर त्यांच्यावरील अन्याय दूर करून त्यांना मदत करण्यासाठी देशभरात चाइल्ड हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. देशभरातील विविध शहरांमध्ये स्वयंसेवी संस्था त्यांचे काम पहातात. पुण्यात ज्ञानदेवी हेल्पलाईन संस्था हे काम पहाते. लहान मुलांवर अन्याय, अत्याचार होत असल्याचे दिसताच या हेल्पलाईनवर संपर्क साधून माहिती द्यावी.