शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम घाटाच्या बैठकीला पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

By admin | Updated: October 28, 2015 23:51 IST

पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्राबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली खरी

घोडेगाव : पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्राबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली खरी; पण खुद्द पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील साऱ्याच आमदार, खासदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील वगळता एकही लोकप्रतिनिधी या बैठकीला आज उपस्थित नव्हते. पुणे जिल्ह्याच्या ९ तालुक्यांतील ३३७ गावे पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रात येतात. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील आमदार-खासदारांना याविषयाची माहिती द्यावी व त्यांच्याकडून सल्ला-सूचना घ्याव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक आयोजित केली होती. पश्चिम घाटाच्या संदर्भात नुकतीच केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीही काही लोकप्रतिनिधींनी दिल्लीमध्ये चर्चा केलेली होती. तसेच याविषयी आता पर्यावरणतज्ज्ञांकडून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीमध्ये चांगली चर्चा होणे अपेक्षित होते. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीमुळे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली तरी जिल्हाधिकारी यांनी वळसे पाटील यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या वेळी वळसे पाटील यांनी पाच मुद्दे उपस्थित करून याबाबत केंद्र सरकारला कळविले जावे असे सुचवले. हे मुद्दे त्यांनी मांडले व जिल्हाधिकारी यांनी केंद्र सरकारला कळवावे असे सांगितले. या बैठकीस लोकप्रतिनिधींनी जरी पाठ फिरवली असली तरी अधिकारी मात्र उपस्थित होते. (वार्ताहर)