शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यातील दरड दुरुस्तीचा प्रस्ताव प्रलंबित

By admin | Updated: August 1, 2014 05:20 IST

येरवड्यातील रामनगर वसाहतीत आज पुन्हा एकदा दरड कोसळली. सुदैवाने दु:खद घटना घडली नाही.

पुणे : येरवड्यातील रामनगर वसाहतीत आज पुन्हा एकदा दरड कोसळली. सुदैवाने दु:खद घटना घडली नाही. परंतु, वर्षभरापूर्वीच महापालिकेने येरवड्यातील दरड कोसळण्यास प्रतिबंधात्मक उपाययोजनेला परवानगी आणि तीन कोटींच्या निधीचा प्रस्ताव दिला होता. त्याचा अनेकदा पाठपुरावा करूनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रस्ताव अद्याप प्रलंबित असल्याची माहिती उजेडात आली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात येरवड्यात दरड कोसळून रामनगरमधील काही झोपड्या उद्ध्वस्त झाल्या होत्या. या घटनेनंतर महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संरक्षक भिंत बांधण्याचे जाहीर केले. टेकडीचा परिसर वन विभागाच्या अखत्यारित असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी परवानगी आवश्यक होती. तसेच, मुळा आणि मुठा नदीच्या दोन्ही काठांवर पूरनियंत्रण आणि पूरपातळीची माहिती देणारी चिन्हे आणि फलक बसविणे व दरड कोसळू नये म्हणून प्रतिबंधात्मक जाळी व संरक्षक भिंत उभारण्याविषयीचा सुमारे तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. २२ आॅक्टोबर २०१३ ला पाठविलेल्या प्रस्तावाला महसूल व वन विभागाच्या सचिव यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन आठवड्यांपूर्वी प्रलंबित प्रश्नांची आढावा बैठक झाली. त्या वेळी येरवड्यातील दरड प्रतिबंधक व पूरनियंत्रण उपाययोजनांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. शहरातील नैसर्गिक नाल्यातील अतिक्रमण रोखण्यासाठी ‘मॉनेटरिंग सिस्टिम’ तयार करणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यासाठी दीड कोटी रुपयांच्या निधीची मागणीही महापालिकेने मे २०१२ रोजी मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली होती. परंतु, त्यालाही अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. (प्रतिनिधी)