शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना दंडमाफी

By admin | Updated: June 28, 2017 04:29 IST

अनधिकृत बांधकामांना दंडमाफी करण्याबाबत स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मंगळवारी संमतीची मोहोर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अनधिकृत बांधकामांना दंडमाफी करण्याबाबत स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही मंगळवारी संमतीची मोहोर उमटविण्यात आली. ६०० चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. अशी सुमारे साडेनऊ हजार बांधकामे महापालिकेच्या हद्दीत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.हे बांधकाम निवासी असणे आवश्यक आहे. तसे असेल तरच दंडमाफीची सवलत मिळेल. तसेच, ६०१ पासून पुढे १ हजार चौरस फुटांपर्यंतच्या अनधिकृत निवासी बांधकामाला दर वर्षी मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने दंड करण्यास मान्यता देण्यात आली. १ हजार चौरस फुटांच्या पुढील अनधिकृत बांधकामाला दर वर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने करआकारणी होणार आहे. हा निर्णय झाल्याच्या तारखेपासूनच त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.स्थायी समितीने या प्रस्तावाला आधीच मंजुरी दिलेली होती. मंगळवारच्या सभेत सर्वसाधारण सभेचीही या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामांना दंड करण्याचे अधिकार राज्य सरकारने महापालिकांना दिले आहेत. मात्र, या दंडामध्ये सर्व ठिकाणी एकवाक्यता असावी, तसेच त्यात गरिबांवर अन्याय होऊ नये, अशीही भूमिका सरकारने व्यक्त केली होती. त्यानुसार सरकारी आदेशाप्रमाणेच महापालिकेने हा निर्णय घेतला असल्याचे प्रशासनाने सांगितले.महापालिका क्षेत्रात ६०० चौरस फुटांपर्यंत अनधिकृत बांधकाम असलेली सुमारे ९ हजार ५२१ घरे आहेत. या सर्व घरमालकांना महापालिकेच्या या निर्णयाचा फायदा मिळेल. ६०१ ते १,००० चौरस फुटांपर्यंत अनधिकृत बांधकाम असलेल्या सदनिकांची संख्या २ हजार ३६५ आहे.यापूर्वी त्यांना तिप्पट दंड आकारण्यात येत होता, तो आता मालमत्ता कराच्या ५० टक्के दराने दर वर्षी आकारण्यात येईल.