पाबळ येथील ग्रामीण रुग्णालय लवकर सुरू करण्याची मागणी शिरूरच्या पाबळ,धामारी, खैरेनगर,कान्हूर मेसाई,आदी भागातील नागरीक करत आहेत./ विधान सभेचे माझी अध्यक्ष कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे यांच्या प्रयत्नातून पाबळ येथे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचं काम पूर्ण होवून सहा महिने झाले आहे .या भागत वाढत करोना रुग्ण पहाता हे रुग्णांनालय सुरू होणे अपेक्षित होते .सध्या या भागातील रुग्णांनाना मलठन आवसरी, खेड, या ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे.
काही दिवसानपूर्वी आमदार दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे,शिरुर हवेली मतदारसंघाचे आमदार अशोकराव पवार, त्याच बरोबर शासकीय आधिकारी यांनी येथे भेटी दिल्या होत्या व लवकरच रुग्णालय सुरू करणार असल्याचे सांगीतले होते .परंतु ते अध्यापही सुरु झाले नसून येथील रुग्णालय लवकरात लवकर सुरू करणाची मागणी या भागातून होत आहे. परिसरातील नागरीकांना लसीकरणासाठी केंदूरला जावे लागते . साठ वर्षावरील वृद्धांना तेथे जाण्यासाठी एस् टीच्या सुविधा नाहीत . त्यापेक्षा सर्व सुविधांनी युक्त असणाऱ्या पाबळकेंद्रावर लसीकरण सुरू केले तर गर्दीचा धोका टळेल, नागरीकांचे हेलपाटे वाचतील, प्रवासाच्या अडचणी दूर होतील अशी नागरिकांची मागणी आहे .
--
फोटो क्रमांक: शिक्रापूर रुग्णालय
फोटो...पाबळ ता. शिरूर येथे उभारलेले ग्रामीण रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी नसल्याने व उद्घाटन न झाल्याने धूळखात पडले .
--