शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार करून प्रवाशाचा खून

By admin | Updated: July 26, 2015 00:37 IST

पुणे-सातारा महामार्गावर वरवे खु.येथे हॉटेल नटराज येथे चहापानासाठी थांबलेल्या प्रवासी युवकावर तिघा जणांनी बेछूट गोळीबार करून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला़

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर वरवे खु.येथे हॉटेल नटराज येथे चहापानासाठी थांबलेल्या प्रवासी युवकावर तिघा जणांनी बेछूट गोळीबार करून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला़ चंद्रशेखर आचार्य (वय ३०, रा. बंगळुरू) असे या प्रवाशाचे नाव आहे़ ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजता घडली़ राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-सातारा महामार्गावर वरवे खु. येथील हॉटेल नटराजवर चहापानासाठी अनेक गाड्या थांबतात. त्यापैकी शिर्डीवरून बंगळुरूकडे जाणारी व्हीआरएल कंपनीच्या बसमधून चंद्रशेखर आचार्य व त्याचा मित्र अभिलाष हे इतर प्रवाशांसह चहापानासाठी गाडीतून खाली उतरले. किरकोळ खरेदी करीत असताना ३ ते ४ जणांनी चंद्रशेखर आचार्य यांच्या छातीवर दोन व पाठीवर एक गोळी अशा एकूण तीन गोळ्या झाडल्या़ त्यात चंद्रशेखर जमिनीवर खाली पडताना त्याचे तोंडावर, हातावर कोयत्याने तिघांनी वार केले. चंद्रशेखर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यावर हल्लेखोर पळून गेले़ हल्ला झाला त्या वेळी हॉटेल नटराज येथे तीन ते चार बस व त्यातील प्रवासी होते़ गोळीबार होताच एकच पळापळ झाली़ घबराटीत प्रवासी स्वत:ला वाचविण्यासाठी पळू लागल्याने हल्लेखोर कसे आले व कसे गेले, याची काहीही माहिती मिळू शकली नाही़ - चंद्रशेखर आचार्य व त्याचे मित्र गावाकडे साईबाबांचे मंदिर बांधणार आहेत. त्यासाठी ते मूर्ती घेण्यासाठी शिर्डीला आले होते़ मूर्ती खरेदी करून इतरांबरोबर त्यांनी ती गावाला पाठवून दिली़ खासगी बसने ते बंगळुरूला जात होते़ आचार्य हे जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले़ त्यातूनच हल्लेखोरांनी पाठलाग करून हा हल्ला केल्याचे प्राथमिक माहितीनुसार पोलिसांचा संशय आहे़ त्यादृष्टीने तपासासाठी राजगड पोलीस ठाण्याचे पथक बंगळुरूला गेले आहे़