शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्वीन रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : प्रवासी कमी असल्याचे कारण पुढे करून, पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी एकमेव डेक्कन क्वीन ही गाडी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : प्रवासी कमी असल्याचे कारण पुढे करून, पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी एकमेव डेक्कन क्वीन ही गाडी शुक्रवारपासून (दि.१४) रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या शेकडो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रचंड असंतोष पसरला आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन झाल्यापासून रेल्वे सेवा बंद झाल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रवाशांना भर पावसाळ्यात खासगी वाहनाने, दुचाकीने आपला जीव धोक्यात घालून आर्थिक नुकसान सहन करून प्रवास करावा लागला होता. ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन ही एकमेव गाडी सुरू करण्यात आली. त्यातही आरक्षण करूनच प्रवास करावा लागत होता. तरी या प्रवाशांनी कित्येक महिने दरमहा चार ते पाच हजार रुपये खर्चून रेल्वेने प्रवास केला. कोरोनाच्या महामारीचे संकट असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत होते. रेल्वेचे अधिकारी केवळ फायदा तोट्याच्याच विचार करतात. दैनंदिन प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा जराही विचार केला जात नाही. रेल्वे सेवा बंद असल्यामुळे हजारो खासगी कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. राज्य सरकारी, बॅंक, पोलीस, आरोग्य विभाग, महापालिका, रेल्वे, विद्युत विभाग यासह खासगी क्षेत्रातील हजारो चाकरमान्यांना या गाडीने प्रवास करावा लागतो. कामाच्या ठिकाणी कसे जावे, हा मोठा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहिला आहे. या सर्व प्रवाशांना आता मोठ्या प्रमाणात त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

कोट

डेक्कन क्वीन गाडीला पुणे-लोणावळा-दादर आणि परतीच्या प्रवासात सीएसएमटी-कर्जत-लोणावळा-पुणे इतके कमी थांबे असल्यामुळे प्रवासी संख्या कमी आहे. डेक्कन क्वीनऐवजी जादा थांबे असलेली सिंहगड एक्स्प्रेस सुरू ठेवली तर प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ हाईल. फायदा-तोट्याचा विचार न करता डेक्कन क्वीन किंवा सिंहगड एक्स्प्रेस या गाड्या अविरत सुरू ठेवाव्यात.

- इक्बाल मुलाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना, पिंपरी -चिंचवड