शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भाजपात गटबाजी आली उफाळून

By admin | Updated: June 22, 2017 07:22 IST

पिंंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकार आणि कर्तव्ये, विषयांचे सादरीकरण, सभाशास्त्र, महापौरांचे वाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकार आणि कर्तव्ये, विषयांचे सादरीकरण, सभाशास्त्र, महापौरांचे वाहन, विविध समिती सदस्य निवड यावरून गटबाजी उफाळून येत आहे. त्यामुळे चिंचवडसमर्थक विरुद्ध भोसरीसमर्थक अशी गटबाजी दिसून येत आहे. मात्र, आमच्यात कोणतीही गटबाजी नसल्याचे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली असली, तरी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांच्या गटांतील समर्थकांमध्ये मतभेद असल्याच्या घटना घडल्या आहेत. महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विषय समिती अध्यक्ष, स्वीकृत सदस्य, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य निवडीच्या वेळी वाद उफाळून आला आहे. समर्थकांमध्ये वादावादीजून महिन्याची सर्वसाधारण सभा काल झाली. सायंकाळी सभा संपल्यानंतर पक्षनेत्यांच्या दालनात दोन नेत्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. नवीन सदस्यासमोरच ज्येष्ठांची वादावादी सुरू झाल्याने तेही अवाक् झाले. महापौरांना नवीन वाहन आणि सभाशास्त्र, सभागृह कसे चालवायचे, हक्क आणि कर्तव्ये यावरही सवाल-जबाब झाले. याची माध्यमांकडे वाच्यता होऊ नये म्हणून पदाधिकाऱ्यांचे खासगी पीए, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढले. त्यानंतर सुमारे तासभर वादावादी सुरू होती. यावर तोडगा काढण्यासाठी परदेश दौऱ्यावर असणाऱ्या नेत्याचा फोनही महापौरांनी उचलला नाही. ज्येष्ठ सदस्य आणि सर्वांनी दोघांची समजूत काढल्यानंतर प्रकरणावर पडदा पडला. दरम्यान, असे काही घडलेच नाही, असे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यातून भाजपात गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आले. दरम्यान भाजपाचे भोसरीचे नेत्यांनी २२ नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावून सदस्यांना सूचना केल्या. त्यामुळे गटबाजी अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.