शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

पक्षांमध्ये गुणात्मक बदल आवश्यक

By admin | Updated: January 11, 2015 00:50 IST

देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे.

पुणे : देशातील सर्वच पक्षांमध्ये चांगल्या नेत्यांची कमतरता आहे. राजकीय पक्षांमधील मतभिन्नता राजकारणाची समस्या नसून विचारशून्यता ही खरी अडचण आहे. त्यासाठी सर्व पक्षांसह राजकारणात गुणात्मक बदल आवश्यक आहे. राजकारणात येणाऱ्या तरुणांनी सर्व भेद बाजूला ठेवून व्यापक दृष्टिकोनातून विकासाचे राजकारण केल्यास हे परिवर्तन निश्चित होईल, असे प्रतिपादन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार रेणुका चौधरी, खासदार किरण खेर, माजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, केंद्रीय युवक कल्याण विभागाचे सचिव राजीव गुप्ता, ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग, प्रियदर्शनी अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष नानिक रुपाणी, माईर्स एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, छात्र संसदेचे संस्थापक निमंत्रक राहुल कराड, डॉ. मंगशे कराड विद्यार्थी प्रतिनिधी सानिध्य बाली व ख्याती राजा व्यासपीठावर उपस्थित होते. चौधरी व खेर यांना या प्रसंगी अनुक्रमे गार्गी पुरस्कार व मैत्रेयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गडकरी म्हणाले, की आमदार, खासदार, मंत्री होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता नसते; पण देशाची ध्येयधोरणे ठरविण्यात त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहे. राजकारण्यांची वागणूक, गैरव्यवहार यांमुळे समाजाचा विश्वास कमी झाला आहे. यात समाजाचा दोष नाही. देशात अनेक समस्या आहेत. त्यांना संधी मानून तरुणांनी देशाच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.भारतात आता पाण्याचा मोठा व्यापार झाला आहे. चांगले राजकारण करायचे असेल, तर पर्यावरणाला महत्त्व द्यायला हवे, असे डॉ. राजेंद्र सिंग यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)४छात्र संसदमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले, ‘‘राजकारणात येण्यासाठी अनेक जण घराकडे दुर्लक्ष करतात. व्यवसायात अपयश आले म्हणून राजकारणात येतात. मात्र, जे लोक स्वत:चे घर सांभाळू शकत नाहीत, त्यांना देश कसा सांभाळता येईल? त्यामुळे तरुणांनी आधी स्वत:ला ओळखावे. आपली जबाबदारी ओळखून राजकारणात प्रवेश करावा.’’४महिला केवळ मनोरंजनाची किंवा घरात राबण्याची वस्तू नाही. तीदेखील क्षमताधिष्ठित, स्पर्धात्मक आणि गुणवत्ताधारक आहे. त्यामुळे महिलांना वगळून देशाचा विकास होऊ शकत नाही, असे चौधरी म्हणाल्या.