शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत अंशत: संचारबंदी. आठवडे बाजार ,मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार,जिम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:10 IST

तोडण्यासाठी सहकार्य करा : प्रशासनाचे आवाहन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करा : प्रशासनाचे आवाहन बारामती :कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे ...

तोडण्यासाठी सहकार्य करा : प्रशासनाचे आवाहन

कोरोनाची साखळी

तोडण्यासाठी सहकार्य करा : प्रशासनाचे आवाहन

बारामती :कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे अंतिमत: बारामती शहरात शनिवार (दि. ३) पासून ७ दिवस अंशत: संचारबंदीची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. वाढणाऱ्या रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेवटी प्रशासनाला निर्बंध कडक करावे लागत आहेत. नागरिकांनी देखील कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बारामती शहर व तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शनिवार (दि.३) पासुन बारामतीत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत व्यवहार सुरू असतील. बारामती शहर व तालुक्यात असणारे मॉल, हॉटेल, फूडकोर्ट, रेस्टॉरंट, बार, चित्रपटगृह, नाट्यगृह, स्विमींगपूल, स्पा, जिम हे सात दिवस बंद असतील. तसेच तालुक्यातील सर्व आठवडे बाजार बंद असतील. बारामती शहर व तालुक्यात सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जमावबंदी तर संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असणार आहे. दूध, भाजीपाला, फळे, वृत्तपत्र सेवेसह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यावसायिक तसेच हॉटेल मधुन पार्सल सेवा सूट देण्यात आली आहे. सध्या सुरु असलेल्या कोविड लसीकरणासाठी नागरिकांना परवानगी असणार आहे.तर सर्व कारखाने व कार्यालय,व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करुन घेणे बंधनकारक आहे.तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा, समारंभांना परवानगी दिली जाणार नाही. तर विवाह सोहळा व अंत्यविधी साठी शासनाच्या नियमाप्रमाणे लोक उपस्थित असतील. दहावी व बारावीच्या ठरलेल्या परिक्षा सोडुन शाळा व महाविद्यालय येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद असेल.तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात जरी संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंतचा आदेश असला तरी बारामती शहरात मात्र सकाळी नऊ पर्यंत संचारबंदी असणार आहे. तर संध्याकाळी सात ऐवजी सहा वाजताच दुकाने बंद राहणार आहे.

पाच पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे.तर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी केल्यास शासनाचे नियम न पाळल्यास ते दुकान बंद करणार आहे.

- दादासाहेब कांबळे

उपविभागिय अधिकारी, बारामती

अंशत: संचारबंदीच्या काळात बारामती शहरात ५ पोलीस अधिकारी ५० पोलीस कर्मचारी, ४० होमगार्ड यांच्या मार्फत शहरात पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. यावेळी शहरात रिक्षावर भोंगे लावून मार्गदर्शन नियमांचे पालन करण्याबाबत सुचना देण्यात येणार आहेत. त्यामध्ये मास्क न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपये दंड, जमावबंदी कायद्यानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास प्रत्येकी १ हजार रूपये दंड करण्यात येणार आहे.

- नामदेव शिंदे

पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस ठाणे