शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमातील पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे केले बंद

By admin | Updated: February 15, 2017 01:18 IST

बिबट्याने मागील महिन्यात कोरेगाव भीमा परिसरात एका तरुणाचा पाठलाग केला होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये

कोरेगाव भीमा : बिबट्याने मागील महिन्यात कोरेगाव भीमा परिसरात एका तरुणाचा पाठलाग केला होता. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, नुकताच शुक्रवारी दुपारी बिबट्या आपल्या बछड्यासह फें्रड्स शाळेजवळ शाळकरी मुलांना दिसला. त्यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावण्याच्या पलीकडे कोणतीच खबरदारी अद्याप घेतलेली नाही.कोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, आपटी, डिंग्रजवाडी परिसरात दोन महिन्यांपासून नर-मादी बिबट्या व दोन पिले नागरिकांना सतत निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. २६ जानेवारी रोजी पहाटे डिंग्रजवाडी येथील एकनाथ हरगुडे यांच्या गोठ्यातील शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. शेळीला उसाच्या फडात ओढत नेत असताना नागरिक पाहत होते, तरीही काहीच करू शकले नाहीत. कुत्रीही मारली तसेच त्याच दिवशी पहाटे कोरेगाव भीमाच्या पोलीस पाटील मालन गव्हाणे यांच्या शेतात बसलेल्या धनगराच्या वाड्यातील घोडीचा फडशा पाडला व दोन कुत्र्यांचा फडशा पाडून पळवून नेले. ३१ जानेवारी रोजी विश्वास गव्हाणे हा तरुण शेतात काम करीत असताना बिबट्याने त्याचा पाठलाग केल्याने त्याच्या जिवावर बेतण्याचा प्रसंग आला होता. मात्र, गव्हाणे प्रसंगावधान राखून विजेच्या खांबावर चढला. त्यामुळे जीव वाचण्यास मदत झाली होती. शुक्रवारी (दि. १०) मादी बिबट्या आपल्या बछड्यासह थेट फ्रेंड्स शाळेच्या मागील बाजूला आल्याचे विद्यार्थ्यांनी व शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे काही पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले आहे. बिबट्याने हिंस्र रूप घेतल्यास नागरिकांच्या जिवावरही बेतण्याचा प्रसंग येऊ शकत असल्याने वन विभागाने बिबट्या व पिलांना पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी दोन महिन्यांपासून करूनही ठोस कार्यवाही होत नाही.