शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केसनंद येथील पाणंद रस्ता केला खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:11 IST

वाघोली : गावकऱ्यांनी विकासकामात समन्वय साधून सहमताने कामे केल्यास गावच्या विकासास वेग येईल. तसेच केसनंद गावकऱ्यांनी विकासकामासाठी घेतलेल्या ...

वाघोली : गावकऱ्यांनी विकासकामात समन्वय साधून सहमताने कामे केल्यास गावच्या विकासास वेग येईल. तसेच केसनंद गावकऱ्यांनी विकासकामासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहे. या खुल्या केलेल्या पाणंद रस्त्याचा फायदा ५० हून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. यापुढेही ग्रामस्थांनी असाच समन्वय साधून गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॅा. राजेश देशमुख यांनी व्यक्त केली.

केसनंद (ता. हवेली) येथील पाणंद रस्ता खुला करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंअंतर्गत दोन पाणंद रस्ते जिल्हाधिकारी यांचे हस्ते खुले करण्यात आले.

यावेळी वाघोली मंडळ क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी,पोलीस विभाग व निर्वाचित लोकप्रतिनिधी यांच्या सोबत ग्रामपंचायत सभागृहात बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांचा नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डाॕॅ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी संजय तेली,तहसीलदार विजयकुमार चौभे,तालुका वैद्यकीय आधिकारी सचिन खरात,गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर,

अधिकारी,मंडल अधिकारी किशोर शिंगोटे,तलाठी बाळासाहेब लाखे ,केसनंदच्या सरपंच रोहिणी सचिन जाधव,उपसरपंच सुनिता दिनेश झांबरे,मिलिंद हरगुडे,वाघोली सरपंच वसुंधरा उबाळे यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी कोरोना प्रतिबंधात्मक उपायांकरिता केलेली कार्यवाही व अडचणी जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतल्या. यात सुधार आणण्याकरिता अधिकाधिक विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आदींबाबत त्यांनी सूचना दिल्या. तर या वेळी प्रशासकांनी मांडलेल्या अडचणींवर अपेक्षित सहकार्य व निधी तत्काळ देण्यात येईल, याची ग्वाही दिली आहे. सूत्रसंचालन प्रमोद हरगुडे, तर प्रस्तावना मिलिंद नाना हरगुडे यांनी केले. रोहिणी सचिन जाधव यांनी आभार मानले.