शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेची बाजारातील पत वाढली

By admin | Updated: November 19, 2015 04:58 IST

महापालिकेचे कर व इतर उत्पन्नामध्ये दरवर्षी वाढ होत आहे त्याचबरोबर शहरामध्ये आयटी कंपन्या, शैक्षणिक केंद्रे यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे.

पुणे : महापालिकेचे कर व इतर उत्पन्नामध्ये दरवर्षी वाढ होत आहे त्याचबरोबर शहरामध्ये आयटी कंपन्या, शैक्षणिक केंद्रे यामुळे रोजगाराच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. पालिकेची गुंतवणूक क्षमता ही कर्जाची परतफेड करण्याच्या दृष्टीने योग्य आहे, असे नमूद करून पुणे महापालिकेला ‘आयएनडी एए प्लस’ मानांकन बहाल करण्यात आले आहे. या मानांकनामध्ये महापालिकेची बाजारातील पत वाढणार असून आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील महापालिकांचे पत मानांकन निश्चित करण्याचे काम इंडिया रेटींग अ‍ॅन्ड रिसर्च प्रा. लि. या कंपनीकडून नुकतेच पार पाडण्यात आले. मुंबई पाठोपाठ केवळ पुण्याला ‘एए प्लस’ मानांकन मिळाले आहे. पुणे महापालिका ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची महापालिका आहे. पुण्याची क्रेडीट रेटींग काढण्याची कार्यवाही एप्रिल २०१५ पासून सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये पुणे महापालिकेच्या मानांकनामध्ये वाढ झाली असल्याची माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली. या वेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर उपस्थित होत्या. महापालिकेचा मागील ५ वर्षांचा ताळेबंद, जमा-खर्च, पुढील ५ वर्षांचे अपेक्षित उत्पन्न व खर्च, पालिकेच्या मालकीच्या मालमत्ता, जमा-खर्च, नियोजित भांडवली प्रकल्प, गुंतवणूक, कर्जे आणि उत्पन्नाचे स्रोत, सद्यस्थितील मोठे प्रकल्प व नियोजित भांडवली प्रकल्प याचा माहिती अभ्यास इंडिया रेटींग कंपनीमार्फत करण्यात आला. त्यामध्ये त्यांना आढळून आलेल्या बाबींचा विशेष उल्लेख पुढीलप्रमाणे करण्यात आला आहे. महापालिकेच्या क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. उत्पन्नाचे स्रोत असलेल्या कर व करेतर उत्पन्न यामध्ये वाढ दिसून येते. तसेच उत्पन्न संकलनाची क्षमताही वाढलेली आहे. नागरी सोयीसुविधा पुरविण्याच्या टक्केवारीमध्ये तसेच सोयीसुविधांवर होणाऱ्या खर्चाचे संकलनाची क्षमता वाढली आहे. पालिकेची गुंतवणूक क्षमता ही कर्जाची परतफेड करण्याच्या दृष्टीने योग्य आहे.महापालिकेची पत वाढल्यामुळे केंद्र शासनाची स्मार्ट सिटी योजना, स्वच्छ भारत अभियान, अमृत योजना, डिजीटल इंडिया, हाऊसिंग फॉर आॅल तसेच शासन पुरस्कृत योजनांमध्ये सहभागी होण्यामध्ये मोठी मदत होणार आहे, असे दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)केवळ २११ कोटींचे कर्जवर्षाला साडे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या पुणे महापालिकेवर केवळ २११ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी दिली. पालिकेला ‘एए प्लस’ मानांकन मिळाल्यामुळे पुढील काळात कर्जरोखे उभारण्यासाठी मोठा फायदा होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.