शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गादीवाफ्यांच्या साह्याने भातशेती फायद्याची

By admin | Updated: November 9, 2015 01:39 IST

जिल्ह्यात ६२ हजार ३०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. मात्र वर्षभर काबाडकष्ट करून हाती काहीच राहत नाही

डिंभे : जिल्ह्यात ६२ हजार ३०० हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून, ९६ हजार ५६५ मे. टन उत्पादन होते. मात्र वर्षभर काबाडकष्ट करून हाती काहीच राहत नाही, अशी अवस्था या शेतकऱ्यांची असते. मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेतीही फायदेशीर व कमी कष्टाची ठरू शकते, हे आंबेगाव तालुक्यातील पोखरी येथील एका शेतकऱ्याने यंदा दाखवून दिले आहे. त्यांनी यंदा ५० गुंठे क्षेत्रात गादीवाफ्यांच्या साह्याने लागवड केली असून सर्व खर्च जाता ३५ हजारापर्यंतचे उत्पन्न हाती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. बाळासाहेब कोळप असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून हा प्रयोग राबविल्याने त्यांची भातशेती कौैतुकाचा विषय झाला आहे. या प्रयोगाला सध्या शेतकरी भेटी देत असून नुकतीच शाश्वत संस्थेने आदिवासी शेतकऱ्यांना त्यांची शिवार फेरी घडवून आणली. कर्जत तालुक्यात भातशेतीसाठी सगुणा राईस तंत्रचा (एस.आर.टी) वापर केला जातो. यातून चांगले उत्पन्न मिळते. यंदा कृषी विभागामार्फत याचा वापर करण्याचे आवाहन भात उत्पादकांना केले होते. आंबेगाव तालुक्यातील सुपेधर, गोहे, पोखरी, राजेवाडी, जांभोरी या गावांतील शेतकऱ्यांच्या शेतात अशा पद्धतीने भातलागवडी केल्या. यातील कोळप यांनी सगुणा राईस तंत्रातील गादीवाफ्याचा प्रयोग केला. याला कृषी विभागाने सहकार्य केले. त्यांनी भात लागवड चिखलनी करून न करता गादी वाफ्यांचा वापर केला. यासाठी त्यांना आधी भातरोप वेगळे तयार करावे लागले नाही. लागवडीसाठी खाचरातील चिखलनी करावी लागली नाही अथवा लागवडीसाठी पावसाची वाट पाहावी लागली नाही. उंच गादीवाफे तयार करून भातपेरणी केली. या प्रयोगासाठी त्यांनी सुरूवातीला उन्हाळ्यामध्ये शेतीची नांगरणी करून ५० गुंठ्यांमध्ये साडेचार बाय दीड फूट उंचीचे एकूण १३० बेड तयार करून घेतले. दोन बेडमधील अंतर १ फूट ठेवले. पुढे पावसाळा सुरू होताच २५ सें.मी, या अंतराने बेडवरती ‘मेणक’ निम गरवा या जातीच्या भागाची पेरणी केली. ५० गुंठ्यावरील पेरणीसाठी २० किलो भातबियाणे लागले. १३ ते १५ हजारांपर्यंत खर्च अपेक्षीत असून आता पीक भरघोस असल्याने ३५,००० हजारांचे उत्पन्न हाती पडेल, असे त्यांनी सांगितले.एकदा तयार केलेले बेड पुढील काही वर्षे वापरात येत असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी बेड तयार करावे लागत नाहीत. याच बेडवर रब्बी हंगामात हरभरा, वाटाण्यासारखी पीके घेतल्यास पोत सुधारून पुढीलवर्षी भातपिकाला याचा फायदा होतो. कोळप यांनी भातशेतीत राबविलेला हा प्रयोग अतिशय चांगला असल्याने शाश्वत संस्थेच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील विविध गावातील शेतकऱ्यांनी या शेतीला भेट देवून या शेतीची माहिती घेतली. त्यांनी राबविलेल्या या प्रयोगाची माहिती घेतली. शेतकऱ्यांनी आपल्याही शेतात असे प्रयोग राबवावेत हा या पाठीमागाचा उद्देश असल्याचे या संस्थेचे बुधाजी डामसे यांनी सांगितले.या वेळी कृषी मंडल अधिकारी डी. एन. गायकवाड, कृषी पर्यवेक्षक बी. एस. इसकांडे, एस. व्ही. आवटे, चासकर, कृृ षी सहायक एस. पी. इंदोरे, एस. एन. बागडे इत्यादी उपस्थित होते. (वार्ताहर)