शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीवर मात करून पठ्ठ्या पोहोचला राष्ट्रीय स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:21 IST

हडपसर : सातवीत असतानाच वडिलांचे छत्र हरपले. तरीसुद्धा त्याने जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी ठेवून वाटचाल केली. लग्नसमारंभामध्ये फेटे ...

हडपसर : सातवीत असतानाच वडिलांचे छत्र हरपले. तरीसुद्धा त्याने जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी ठेवून वाटचाल केली. लग्नसमारंभामध्ये फेटे बांधण्याचे काम केले आणि राष्ट्रीय स्तरावर कबड्डीपटू म्हणून नाव कोरले. असे उल्लेखनीय कार्य करणारा युवक म्हणजे हडपसरमधील (स.नं.१००, गोसावीवस्ती-रामटेकडी) येथील बबलू बन्सी गिरी.

बबलू सध्या एफ.वाय.बी.ए.चे शिक्षण घेत आहे. गोसावीवस्तीमध्ये दहा बाय दहाच्या पत्राच्या खोलीमध्ये आई, दोन भाऊ असा त्यांचा संसार सुरू आहे. मोठा भाऊ मोलमजुरी करतो, त्याला मदत म्हणून बबलूसुद्धा वस्तीमध्ये मिळेल ते काम करत असतो. अगदी वस्तीमध्ये कोणाचे घर बांधायचे असेल तर बांधकामाचे साहित्य वाहून नेण्यासाठी मदत करत असतो. मात्र, कबड्डीचा सराव न चुकता उत्कर्ष क्रीडा संस्थाच्या माध्यमातून योगेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. वयाच्या नवव्या वर्षापासून कबड्डी खेळत असून २०११ साली पहिल्यांदा नॅशनल कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यातून पुढे आत्मविश्वास वाढला. त्यानंतर २०१३ साली १९ वर्षांखाली कबड्डी खेळात सहभागी होण्याचा मान मिळाला.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया २०११-१२, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, मुंबई, हैदराबाद आणि कुरनाल येथील कबड्डी स्पर्धेत यशाची कमान उंच राखण्यात यश मिळाले. आतापर्यंत सांघिक व वैयक्तिक बक्षिसांसह प्रमाणपत्र मिळाली आहेत. या कबड्डीपटूला प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह ठेवण्यासाठीसुद्धा जागा नाही, त्याने छोट्याशा सूटकेसमध्ये आणि घरामध्ये ठेवली आहेत.

राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण, तसेच सांघिक स्वरूपातील पदके मिळाली आहेत. स्थानिक आणि राज्यस्तरीय पातळीवर दोन नंबरच्या संघामध्ये सध्या बबलू खेळत आहे. लग्नसमारंभामध्ये फेटे बांधण्याचे कामही तो आनंदाने करतो, त्यातून दोन पैसे मिळवून संसाराला हातभार लावत आहे. महापालिकेच्या शाळेतून सुरू केलेला प्रवास राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचू शकतो, त्याने सिद्ध करून दाखविले आहे. इंग्रजी आणि अगदी नावाजलेल्या शाळा असली पाहिजे असे काही नाही. जिद्द आणि कष्ट करून महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळविला आहे, त्यामध्ये बबलूचाही वरचा क्रमांक आहे.

कोट

मला ज्या वेदना सहन कराव्या लागत आहेत, त्या झोपडपट्टीतील कोणाही मुलाला लागू नयेत. त्यांना चांगले शिक्षण मिळावे, मार्गदर्शन मिळावे, चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळाली पाहिजे. शासनाच्या योजना आहेत. मात्र, त्या समाजापर्यंत पोहोचत नाही, ही मोठी खंत आहे.

- बबलू बन्सी गिरी, कबड्डीपटू

फोटो : लग्नसमारंभामध्ये फेटे बांधण्याचे काम करून राष्ट्रीय स्तरावर कबड्डीपटू म्हणून नाव कोरलेला हडपसरच्या गोसावीवस्तीतील आपल्या आईसोबत बबलू बन्सी गिरी.