शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या व्यवसायाला अजूनही चालना मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:11 IST

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर केली. त्यानंतर आमच्यासारख्या व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांपासून ...

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने मागच्या वर्षी संचारबंदी जाहीर केली. त्यानंतर आमच्यासारख्या व्यावसायिकांचे पोटापाण्याचे प्रश्न निर्माण झाले. नवीन वर्षांपासून सर्व काही पूर्वपदावर आले आहे. परंतु, आमच्या व्यवसायाला अजूनही चालना मिळाली नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने आम्हाला पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती वाटू लागली आहे ,असे मत व्यावसायिकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. आधीच्या तुलनेत आर्थिक परिस्थिती भरून काढण्यास वेळ लागणार होता. त्यासाठी अजूनही हे धडपड करत आहेत. आता एक वर्ष होऊनही व्यवसाय सुरळीत चालू झाला नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षमपणे उभे राहता येत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

देशात संचारबंदी लागू झाल्यावर सरबत, उसाचे गुऱ्हाळ, चांभार, खाद्यपदार्थ गाडी चालवणारे, स्टॉलवरील चहाविक्रेते, चणे-फुटाणे विक्रेते, अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांना सर्वात जास्त बसला आहे.

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबरच पराराज्यातून पुण्यात व्यवसाय करण्यासाठी ही लोकं येत असतात. लहान व्यवसायातून त्यांच्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाह सुरू असतो. परंतु, अशा अचानक ओढवलेल्या संकटाने पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच त्यांच्या डोक्यावरील कर्जही वाढत जाते. कोरोनाचे सावट अजून असल्याने त्यांच्या मनातील भीती वाढत चालली आहे.

फळ आणि भाजी विक्रेत्या सुरेखा शिंदे म्हणाल्या, मागच्या वर्षी कोरोनामुळे आम्हाला गावी जावे लागले होते. गावी जाऊन राशन भरण्यासाठी आम्हाला कर्ज काढावे लागले. जवळपास सात महिने आर्थिक चणचण भासत होती. त्यामध्ये मला मधुमेहाचा त्रास सुरू झाला. दवाखान्याच्या खर्चही वाढत गेला. आता व्यवसाय सुरू झाला आहे. तरीही महिन्याभराच्या कमाईत ६० टक्के घट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन होऊ नये असेच आमचे म्हणणे आहे.

--

उन्हाळ्यात उसाच्या रसाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण मागच्या वर्षी याच हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद पडला. त्यानंतर पावसाळ्याच्या शेवटी सुरुवात झाली. पण आर्थिक भार कमी झालाच नाही. वर्षभरात ३ ते ४ लाख रुपयांचा व्यवसाय होतो. पण मागच्या वर्षी तर कर्जाचा डोंगरच उभा राहिला. डिसेंबरपासून व्यवसाय पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे व्यवसाय थंडावला आहे.

- पांडुरंग फडतरे, उसाचा रस विक्रेते

--

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केली. त्याचा फटका फक्त गरिबांना बसला आहे. तीन महिने अचानक सर्व बंद झाल्याने आर्थिक संकट उभे राहिले होते. काही महिन्यांनी सर्व काही सुरू होण्यास सुरुवात झाली. पण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. खाण्याचा प्रश्न सुटून चालत नाही. घरभाडे, लाईट बिल इतर गोष्टीही याच्यावरच अवलंबून असतात. सरकार लॉकडाऊनची भीती दाखवत आहे. असे काही झाले तर जगणे कठीण होईल.

- राजू वरछाये, चांभार

---

संचारबंदीपासून आठ महिने व्यवसाय बंद होता. लाईट बिल, घरभाडे सर्व काही थकीत होते. अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पूर्वी महिन्याला ८ ते १० हजार रुपये सुटत होते. पण आता ५ हजारही मिळणे अवघड झाले आहे. शाळा, कॉलेज बंद असल्याने हे घडत आहे. नगरसेवक, राजकीय नेते गरिबांना मदत करतानाचे फोटो टाकतात. पण आमच्यापर्यंत काही पोहोचत नाही. सरकारने लॉकडाऊनचा विचारही करू नये.

- ज्ञानेश्वर सुपेकर, लिंबू सरबत विक्रेते