शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाअखेरपर्यंत पावसाळी कामे पूर्ण करण्याचे आदेश

By admin | Updated: May 15, 2014 04:59 IST

पावसाळ्यातील आपात्कालीन व्यवस्थापनाची कामे आणि उपाययोजना येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिल्या

पुणे : शहरातील मॉन्सूनपूर्व तसेच पावसाळ्यातील आपात्कालीन व्यवस्थापनाची कामे आणि उपाययोजना येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांना दिल्या. या कामांचा आढावा घेण्यासाठी देशमुख यांनी नुकतीच या अधिकार्‍यांची बैठक घेतली. या वेळी या सूचना देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुणे यांनी दिली. शहरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा महापालिका आयुक्तांनी नुकताच प्रत्यक्ष क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर भेट देऊन घेतलेला असून, महापालिका हद्दीतील ओढे, नाले तसेच नदीच्या पात्रात साडपाणी सोडले जात आहे. तसेच, हे सांडपाणी वाहून नेणार्‍या अनेक वाहिन्याही फुटलेल्या असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित होत असल्याचे दिसून आले आहे. त्याअनुषंगाने संबधितांना हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय, रस्त्यावरील खड्डे, शहरातील धोकादायक वृक्ष, इलेक्ट्रीकल पोलची पाहणी करून ते गरज असल्यास काढणे अथवा दुरुस्त करणे; याशिवाय जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी शहरातील धोकादायक सीमाभिंती, जुन्या इमारती, वाडे यांबाबत नोटिसा बजाविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, आपल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पूरजन्य स्थिती उद्भवल्यास आपत्कालीन विभागाच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करून त्या माध्यमातून तयारी ठेवण्याच्या सूचनाही सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्याचे सोनुणे म्हणाले. तसेच, शहरातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत १५ पैकी १२ क्षेत्रीय कार्यालयांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.