शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण 
2
"वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही, अजित पवारांनी..."; देवेंद्र फडणवीसांचे सडेतोड मत
3
खरंच किंग कोहलीनं पळ काढला? संजय मांजरेकरांचं कसोटीतील ‘विराट’ निवृत्तीवर मोठं वक्तव्य, म्हणाले…
4
एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
5
'गजवा-ए-हिंद'साठी पाक फौजा तयार, लष्कर ए तैयबाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ, थेट मोदींना धमकी
6
फक्त एका कुपनच्या जोरावर जगाला लुटणारा 'महाठग'; आजही त्याच मॉडेलवर चालतात मोठमोठे स्कॅम
7
युद्ध पेटणार? US विरोधात ७ देश एकवटले, ट्रम्प यांना केले सतर्क; ग्रीनलँडला दिली होती धमकी
8
साखरपुडा झाला, पूजेसाठी घरी आला आणि होणाऱ्या पत्नीवर दोन वेळा बलात्कार केला; छत्रपती संभाजीनगरमधील तरुणावर गुन्हा
9
"मी राजसाहेबांना डायरेक्ट बोललो, याला तिकीट देऊ नका, कारण..."; आमदार महेश सावंतांचा गंभीर दावा
10
बंटी जहागीरदार कुठे पोहोचला? हत्या करणाऱ्यांना लोकेशनची माहिती देणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी कसे शोधले?
11
फक्त तेलच नाही, तर व्हेनेजुएलात दडलाय सोन्या-चांदीचा मोठा खजिना; ट्रम्प यांचा त्यावर डोळा...
12
Vijay Hazare Trophy : देवदत्त पडिक्कलचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
13
काहीही केलं तरी वजन कमीच होईना... 'रताळं' ठरेल सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत
14
"आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका
15
धूम-३ स्टाईल चोरी, एक बसायचा दुकानात, दुसरा करायचा चोऱ्या, जुळ्या भावांचा प्रताप, पोलीसही अवाक्, अखेरीस...  
16
Beed Crime: बीडमध्ये खड्डा खोदणाऱ्या कामगाराची गोळ्या घालून हत्या, शहरात खळबळ 
17
७ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या गर्भवती पत्नीला संपवलं; पुरावे नष्ट करण्यासाठी घरामागेच अंत्यसंस्कार
18
Video: रोहित शर्माशी चाहत्यांचे गैरवर्तन; भररस्त्यात कारमधूनच 'हिटमॅन'ने घेतली फॅनची शाळा
19
फक्त १ वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड घेताय? थांबा! राधिका गुप्ता यांनी सांगितला गुंतवणुकीचा 'सुरक्षित' मंत्र
20
"तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
Daily Top 2Weekly Top 5

लसींच्या डोसमध्ये अदलाबदली टाळण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. ज्यांनी लसीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे ३५ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना पूर्वी घेतलेल्या लसीचास डोस देण्यात यावा. लसीच्या डोसमध्ये अदलाबदल टाळण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांना दिले आहे. या सोबतच केंद्रावर उलब्ध असलेल्या लसीची माहिती दर्शनी भागात फलकांवर लावण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोविशिल्ड बरोबरच कोव्हॅक्सिनचीदेखील लस देण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणती लस दिली जाणार, याबाबत लसीकरण केंद्राच्या दर्शनी भागात फलक लावण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात १६ जानेवारीपासून ६० वर्षांवरील वृद्ध नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. ११४ केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. त्यात राज्य शासनाकडून जिल्ह्याला कोविशिल्डचे ५० हजार तर कोव्हॅक्सिनचे ५० हजार डोस असे १ लाख डोस मिळाले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडला त्याचे वाटप करण्यात आले आहेत. लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर कोव्हॅक्सिन लस ही केवळ जिल्हा रुग्णालयामध्येच देण्यात आली. परंतु, लस उपलब्धतेनुसार शहरासह ग्रामीण भागातील इतर केंद्रावर देखील कोव्हॅक्सिन देण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांना सोमवारी ३५ हजार डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामधील २० हजार कोविशिल्डचे तर १५ हजार हे कोव्हॅक्सिनचे डोस आहेत.

अनेकांनी पहिला डोस हा कोविशिल्डचा घेतला आहे. तर काहींनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेताना संबंधितांनी जी पहिली लस घेतली आहे, त्या लसीचाच डोस त्यांनी दुसऱ्या वेळेच्या लसीकरणाला द्यावा. त्यात अदलाबादल नको, असे आदेश मुख्यकार्यकारी अधिकरी आयुष प्रसाद यांनी दिले आहे. या सोबतच नागरिकांना तुम्ही कोणती लस घेत आहात, याची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय अनेकदा नागरिकांकडूनदेखील हा प्रश्न विचारला जात असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत लसीकरण केंद्राबाहेर कोणती लस दिली जाणार त्याचे फलक लावण्यास सांगितले आहे.

--