शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या दुभाजकांना मिळणार पर्याय

By admin | Updated: May 9, 2017 04:13 IST

सिमेंट काँक्रिट रस्त्यावर दुभाजकाला धडकून होणाऱ्या अपघातामधील जीवितहानी टाळण्यासाठी थर्माकोल, रबर व अन्य घटकांचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सिमेंट काँक्रिट रस्त्यावर दुभाजकाला धडकून होणाऱ्या अपघातामधील जीवितहानी टाळण्यासाठी थर्माकोल, रबर व अन्य घटकांचा वापर करून दुभाजकाची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात वाहनांचे टायर फुटू नयेत, म्हणून सेन्सरची निर्मिती, ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘फॉल डिटेक्शन जीपीएस ट्रॅकर,’ पर्यावरणात्मक कूकस्टोव्ह अशा ७ उपयुक्त संशोधन भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विकसित केली आहे. प्राचार्य डॉ. आनंद भालेराव यांनी या संशोधनांची माहिती दिली. या वेळी या संशोधनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. प्रा. सचिन चव्हाण व विद्यार्थ्यांनी या ‘कंपोझिट रोड डिव्हायडर’ची निर्मिती केली आहे. या दुभाजकाची माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेसाठी बोलाविले आहे. इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रा. आर. बी. घोंगडे यांनी ‘टायर टेंपरेचर मॉनिटरिंग सिस्टिम निर्माण केली आहे. वाहनांचा वेग वाढल्याने टायरचे तापमान वाढते. त्यामुळे टायर फुटून अपघात होण्याची संख्या जास्त आहे. टायरचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी नवे सेन्सर विकसित केले आहे. हे सेन्सर टायरजवळ लावण्यात येणार आहे. त्यामुळे टायरच्या तापमानाची माहिती स्मार्टफोनद्वारे वाहनचालकाला मिळू शकणार आहे. मेकॅनिकल शाखेचे प्रा. प्रदीप जाधव यांनी अल्ट्रासॉनिक असिस्टेड इलेक्ट्रोकेमिकल मशिनिंग विथ रोटेटिंग इलेक्ट्रोड ही संशोधन प्रणाली विकसित केली आहे.