शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

भटकळवाडीत रेल्वे मोजणीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वडगाव कांदळी : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून मंगळवारी (दि.१०) भटकळवाडी (ता. जुन्नर) ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वडगाव कांदळी : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून मंगळवारी (दि.१०) भटकळवाडी (ता. जुन्नर) येथे जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे अधिकारी व इतर शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करून न देता माघारी पाठवले. जुन्नर तालुक्यात या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.

भूसंपादन प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष जमीनीची मोजणी करण्यासाठी भटकळवाडी येथे महारेलचे उपमहाव्यवस्थापक शिरोळे, व्यवस्थापक मंदार विचारे, समन्वयक चंद्रकिशोर भोर, मंडलाधिकारी, तलाठी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नर, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता हे सर्वजण शेतकऱ्यांच्या संभाव्य नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी व पंचनामे करण्यासाठी भटकळवाडी या ठिकाणी मंगळवारी (दि.१०) आले होते. यावेळी शेतकऱ्यांनी मोजणी करण्यास विरोध करत माघारी पाठविले. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, वडगाव कांदळी, नगदवाडी, भटकळवाडी, आळे, कोळवाडी, संतवाडी या गावातून पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे जात आहे. यासाठी महारेलने मोजणीची प्रक्रिया सुरू सुरू केली आहे. परंतु शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला किती? याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नाही. यामुळे या प्रकल्पाला आम्ही जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका शेतकऱ्यांनी लावून धरल्याने महारेलचे अधिकारी व मोजणी अधिकारी यांना मोजणी न करता माघारी जावे लागले. यावेळी रेल्वेविरोधी शेतकरी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष नीलेश भुजबळ, कृती समितीचे पदाधिकारी अनिल वाघुले, गणेश वाजे, शरद पिंगळे, वैभव शिंदे, अजित सहाने, सुरेश भुजबळ, दिनेश शिंदे, अविनाश गणगे, वसंत कुराडे, गेनभाऊ हुलवळे, शिवदास खोकराळे, शरद गाढवे, शेखर भुजबळ, गणेश गुंजाळ, पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अंबादास हांडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्नर तालुक्यातून रेल्वेला मोठा विरोध

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, हिवरे तर्फे नारायणगाव, नगदवाडी, वडगाव कांदळी, भटकळवाडी, आळे, कोळवाडी, संतवाडी या गावांमधून हायस्पीड रेल्वे जात आहे. अनेक ठिकाणी बागायती क्षेत्र असल्याने अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. यामुळे प्रकल्पाला शेतकरी विरोध करीत आहेत. हिवरे तर्फे नारायणगाव,वडगाव कांदळी,भटकळवाडी या गावांनी मोजणी प्रक्रियेलाच विरोध केला आहे. या प्रकल्पाला आम्हाला जमीनच द्यायची नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.