शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या कचऱ्यास मोशीकरांचा विरोध

By admin | Updated: September 15, 2014 05:07 IST

संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा टाकत असलेल्या मोशीतील कचरा डेपोस स्थानिकांकडून विरोध होत असतानाच, आता पुण्यातील कचरादेखील मोशीत जिरविण्याचे निश्चित झाले

पिंपरी/मोशी : संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा कचरा टाकत असलेल्या मोशीतील कचरा डेपोस स्थानिकांकडून विरोध होत असतानाच, आता पुण्यातील कचरादेखील मोशीत जिरविण्याचे निश्चित झाले आहे. पुण्याचा कचरा मोशीत टाकण्यास नागरिकांकडून तीव्र विरोध होत असून, ‘कचरा कुणाचा, टाकणार कुठे?’ या शब्दात त्यांच्या कडून संतापही व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या १८ लाखांच्या वर आहे. संपूर्ण शहराचा ओला व सुका कचरा मोशीतील कचरा डेपोत टाकला जातो. ८१ एकरांवर असलेल्या या कचरा डेपोत रोजचा साडेसहाशे टन कचरा पडतो. यातील पाचशे टन कचऱ्यावर प्रकिया केली जाते. या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, या कचरा डेपोला नागरिकांचा विरोध आहे. यासाठी अनेकदा आंदोलनही झाले आहे. सध्याच्या कचरा डेपोमुळे गंधर्वनगरी, आदर्शनगर, खान्देशनगर, बोऱ्हाडेवाडी, तसेच मोशीतील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दूर अंतरावर या कचऱ्याची दुर्गंधी पसरते. सध्याच्या कचरा डेपोत कुत्र्यांच्या टोळ्या असतात. हीच कुत्री निवासी क्षेत्रात येतात. या कुत्र्यांचादेखील नागरिकांना त्रास होतो. डेपोच्या परिसरात निवासी भाग असून, येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होतो. या कचरा डेपोमुळे या भागातील रहिवाशांनी सदनिका विकल्या असून, इतर ठिकाणी स्थायिक झाले आहेत. हा डेपो येथून हटवावा, अशी नागरिकांची मागणी होत असून, डेपो हलविण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, डेपो आहे त्याच जागेवर आहे. असे असताना पुण्याचा कचरा जिरविण्यासाठी मोशीतील एक खाण निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठीची २५ हेक्टर जागा पुणे महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने निश्चित केली असून, या जागेसाठीचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून लवकरच राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे. पुणे शहरात दररोज निर्माण होणारा कचरा उरुळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये जिरविण्यात येतो. मात्र, या ठिकाणचा कचरा डेपो बंद करावा, या मागणीसाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी विरोध करीत आंदोलन छेडले होते. यानंतर महापालिकेकडून गेल्या दोन महिन्यांपासून शास्त्रीय पद्धतीने भू-भराव (सायंटिफिकलँडफिलिंग) घालून खाणींमध्ये जिरविण्यासाठी खाणींचा शोध घेतला जात होता. मोशीतील शासकीय खाणींची जागा निश्चित करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता पुण्याचा कचराही मोशीत येणार असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. मोशी खाण परिसरापासून थोड्याच अंतरावर औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती असे विविध प्रकल्प होणार आहेत. तसेच, विविध गृहप्रकल्पदेखील सुरू आहेत. त्या प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)