शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नि व ड णु की सा ठी का ही ही

By admin | Updated: July 25, 2015 05:05 IST

हवेली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यांतील रंगत वाढू लागली आहे. अनेक गावच्या

लोणी काळभोर : हवेली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस यांतील रंगत वाढू लागली आहे. अनेक गावच्या अतिउत्साही सधन पॅनलप्रमुखांनी आपल्या गावातील पॅनलची जुळवाजुळव पूर्ण करण्याकामी आरक्षण प्रवर्गातील उमेदवार मिळत नसल्यामुळे उमेदवारांची सरकारी थकबाकी व ग्रामपंचायत घरपट्टी व इतर कर भरल्याने आता आपण निवडून येवो अथवा न येवो; परंतु आपली शासकीय थकबाकी शून्य झाल्यामुळे ते खूश आहेत. मिळालेल्या लायक उमेदवारास आपल्या पॅनलमधून उमेदवारी देण्यासाठी केवळ शौचालय नसल्याचा अडसर होऊ नये, म्हणून चक्क पॅनलप्रमुखांनी स्वखर्चातून त्वरित शौचालय बांधून दिले व त्याची ग्रामपंचायत दफ्तरी नोंद केल्यामुळे पॅनलप्रमुखास चांगला उमेदवार मिळाला, तर त्या व्यक्तीस शौचालय तेही मोफत बांधून मिळाल्याने दोघांच्याही अडचणी दूर झाल्या. विशेष म्हणजे त्याच्या विरोधकांनी माघार घेतल्यामुळे हा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. बऱ्याच वेळेस खुल्या प्रवर्गातील उमेदवारास आपल्या प्रतिष्ठेपायी व मतांच्या बेरजेच्या आशेपोटी प्रभागातील इतर आरक्षित उमेदवारांचा खर्चही मोठ्या प्रमाणावर उचलावा लागतो. पूर्व हवेलीतील पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका ग्रामपंचायतीच्या प्रभागात आरक्षण प्रवर्ग विभागातील एक उमेदवार मिळत नसल्यामुळे पॅनलप्रमुख हैराण झाले होते. त्यांना निवडून येण्याची खात्री असलेला एक उमेदवार मिळाला; परंतु त्याच्याकडे शौचालय नसल्यामुळे शासकीय अटीनुसार तो उमेदवारीच्या कक्षेत बसत नव्हता. तो त्या भागात लोकप्रिय व सर्वांशीच मिळून मिसळून असल्यामुळे तसेच त्याच्याकडे जातीच्या दाखल्यासह निवडणूक लढवण्यास लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्यामुळे त्याला निवडणुकीस उभे राहण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्या व्यक्तीने आपली परिस्थिती सधन नसल्याने व आपल्याकडे शौचालय नसल्यामुळे निवडणूक रिंगणात उतरण्यास प्रामाणिकपणे नकार दिला. परंतु आपली राजकीय प्रतिष्ठा राजकीय गुणांची चुणूक दाखवत, अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी पॅनलप्रमुखांसमवेत त्यांच्या क्रियाशील कार्यकर्त्यांनी फक्त आश्वासन न देता तसेच वेळ न दवडता तत्काळ सरकारी थकबाकी पूर्णपणे भरून दोनच दिवसांत शौचालय उभारून त्या सर्वमान्य उमेदवाराची व पॅनलचीही अडचण दूर केली. (वार्ताहर)