शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

तोडफोडीचा घोष यांचा धनादेश वाऱ्यावरच

By admin | Updated: April 28, 2017 06:00 IST

स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी केलेल्या तोडफोडीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस गणेश घोष यांनी दिलेला

पुणे : स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी केलेल्या तोडफोडीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस गणेश घोष यांनी दिलेला ५१ हजार रुपयांचा धनादेश हवेतच राहण्याची चिन्हे आहेत. असा धनादेश वटवण्यासाठी महापालिकेत कसेलच हेड (शीर्षक) नाही. त्यातच घोष यांनी महापौर, पुणे महापालिका अशा नावाने धनादेश दिला आहे व या नावाचे खातेच महापालिकेत नाही. स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात तोडफोड केली. त्याची नुकसान भरपाई म्हणून घोष यांनी महापौरांना ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र आता घोष यांचाच धनादेश वटवण्यात अडचणी येत आहेत. महापौरांच्या नावे कोणत्याही बँकेत महापालिकेचे खाते नाही. त्यामुळे घोष यांना हा धनादेश नाव बदलून द्यावा लागेल. तो त्यांनी आयुक्त, महापालिका या नावे दिला तर तो जमा होऊ शकतो. कारण महापालिकेची सर्व बँकांमधील खाती याच नावाने आहे, मात्र त्यातही अडचण आहे. एखादा विभाग जोपर्यंत या धनादेशाचे चलन करून देत नाही, तोपर्यंत लेखा विभाग हा धनादेश जमा करून घेणार नाही. कोणतेच खाते हा धनादेश त्यांच्या खात्यात जमा करून देणार नाही, कारण त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम कशापोटी जमा करून घेतली त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.