शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कर्जमाफीचा २० टक्के शेतकऱ्यांनाच फायदा

By admin | Updated: June 13, 2017 03:59 IST

पुणे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड केलेली असल्याने केवळ १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्ह्यातील तब्बल ७० टक्के शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पीककर्जाची परतफेड केलेली असल्याने केवळ १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षांमध्ये तब्बल ३ लाख ४९ हजार शेतकऱ्यांना जिल्हा बँक व अन्य राष्ट्रीय कृत बँकांच्या मार्फत तब्बल ३ हजार ३२२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यापैकी ६५ ते ७० टक्के शेतकऱ्यांंनी पीक कर्जांची परतफेड देखील केली आहे. यामुळे शासनाच्या कर्जमाफीचा पुणे जिल्ह्यातील केवळ ५५ ते ६० हजार शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे साधारणत: साडे पाचशे कोटी रुपयांचेच कर्ज माफ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्य शासनाने सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली आहे. अद्याप याबाबचे निकष काय असतील, अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच कर्ज माफी मिळेल की सरसकट सर्व शेती कर्ज माफ केली जातील याबाबत कोणतीही स्पष्टता अद्याप आलेली नाही. त्याचबरोबर केवळ पिककर्जासाठी ही माफी आहे की ‘शेड-नेट‘, गायगोठा यासारखी कर्जे घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार याबाबतही अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नक्की किती शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा होईल हे शासनाचे आदेश आल्यानंतरच खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल.पुणे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. ऊसाचे बिल हे जिल्हा बॅँकेत जमा होत असल्याने तेथूनच कर्जाचा हप्ता जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जे थकीत राहत नाहीत. याशिवाय अनेक शेतकऱ्यांनी कर्जप्रकरणाचे ‘नवे-जुने’ केले आहे. यामध्ये नव्याने कर्ज काढून मागील वर्षीचे कर्ज फेडले जाते. त्यामुळे या नव्या कर्जाला ‘थकीत’ नसल्याने माफी मिळणार का? हा देखील प्रश्न आहे.जिल्ह्यात एकूण तब्बल ७ लाख ४६ हजार शेतकरी विविध बँकांचे खातेदार आहेत. यापैकी पीक कर्जांचे वाटप ३ लाख ४९ हजार शेतकऱ्यांंना वाटप करण्यात आले. यामध्ये सर्वांधिक २ लाख ६३ हजार शेतकऱ्यांना एकट्या जिल्हा बँकेच्या वतीने कर्ज वाटप करण्यात आले आहे. गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे जिल्हा बँकेसह राष्ट्रीय कृत बँकांना पीक कर्जाचे शंभर टक्के वाटप केले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने १ हजार ७९४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये अल्पमुदतीचे कर्ज केवळ १ हजार १७० कोटी रुपयांचे आहे. पुणे जिल्ह्यात पीक कर्ज वसूलीचे प्रमाण ६० टक्क्यांच्या पुढे आहे. यंदा शासनाकडून कर्ज माफी केली जाणार म्हणून केवळ ५७ टक्के शेतकऱ्यांनी कर्ज परत भेट केले आहे. यामुळे शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्यावर पुणे जिल्ह्यात प्रामाणिकपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.कर्जमाफीत बारामतीतील १५ हजार अल्पभूधारकबारामती : शेतकऱ्यांच्या संपानंतर राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे. या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल आणि सहकार खात्याला कोणतेही आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत, तरीदेखील बारामती तालुक्याचे तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या सूचनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांनी माहिती संकलित केली आहे. त्यानुसार बारामती तालुक्यातील १० ते १५ हजार शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. जवळपास ७० ते ८० कोटी रुपये शेतीकर्ज माफ होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. भोरमधील साडेअकरा हजार शेतकऱ्यांना फायदाभोर : अल्पभूधारक, मध्यमभूधारकांचे थकीत कर्ज माफ होणार असल्याने भोर तालुक्यातील ११ हजार ४४७ शेतकरी सभासदांचे सुमारे ४५ कोटी ३२ लाखांचे कर्ज माफ होणार आहे. मात्र वेळेत कर्ज फेडलेल्या ८०३६ सभासदांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भोर तालुक्यातील अल्पभूधारक (५ एकरच्या आत) असलेल्या ६७१९ शेतकरी सभासदांनी सुमारे ३४ कोटी ८९ लाख रुपये वेगवेगळ्या पिकांसाठी पीककर्ज घेतले होते, ते थकलेले आहे. मुळशीत सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची आशापौड : राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमुळे तालुक्यातील लहान व मोठ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या कर्जमाफीचा लाभ आपल्याला होणार असल्याचे आता शेतकरीच बँकेच्या कर्जवसुली अधिकाऱ्यांना ठणकावून सांगत आहेत. मात्र, राज्य शासनाच्या सरसकट कर्जमाफी, तत्त्वत: मान्यता व निकषासह कर्जमाफी या शब्दांमुळे शेतकरी व बँक अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. अध्यादेश आल्याशिवाय स्पष्टता नाहीशासनाने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यामध्ये सरसकट कर्ज माफीसाठी तत्वत: मंजुरी असे जाहिर केले आहे. याबाबत अद्याप कोणत्याही स्वरुपाची स्पष्टता नाही. थकबाकीदार शेतकऱ्यांनादेखील पीक कर्जांचे वाटप सुरु असल्याचे म्हटले आहे. परंतु नोटा बंदीमुळे सर्वच जिल्हा बँका अडचणीत आल्या असताना व हजारो कोटीच्या जुन्या नोटा पडून असताना थकबाकीदार शेतकऱ्यांना कुणाच्या भरवशावर कर्ज वाटप करायचा असा प्रश्नच आहे. त्यामुळे शासनाचे कर्जमाफी बाबत स्पष्ट आदेश आल्यानंतरच थकबाकीदार शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- रमेश थोरात, अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक