शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १८० व्हिडीओंना मान्यता

By admin | Updated: February 16, 2017 03:37 IST

शहर व उपनगरांमध्ये अनेक उमेदवारांनी एलईडी स्क्रीन तसेच माध्यमांमधून प्रचाराची मोहीम उघडली आहे. मात्र, निवडणूक कार्यालयाकडे

पुणे : शहर व उपनगरांमध्ये अनेक उमेदवारांनी एलईडी स्क्रीन तसेच माध्यमांमधून प्रचाराची मोहीम उघडली आहे. मात्र, निवडणूक कार्यालयाकडे बुधवारपर्यंत केवळ १८० व्हिडीओ सीडींना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे काही उमेदवारांकडून मान्यता न घेताच प्रचाराचे व्हिडीओ दाखविले जात असल्याचे चित्र आहे.निवडणूक कार्यालयामध्ये प्रचाराच्या जाहिराती, व्हिडीओ मान्यतेसाठी स्वतंत्र समिती तयार करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार करायचा आहे, त्यांना संबंधित व्हिडीओची सीडी मान्यतेसाठी समितीकडे सादर करावी लागते. या समितीतील सदस्य संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याला मान्यता देण्याबाबत निर्णय घेतात. व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला समितीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. अशी परवानगी न घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. असे असले, तरी शहर व उपनगरांतील उमेदवारांकडून त्याचे पालन होत असल्याचे दिसत नाही. समितीने बुधवारपर्यंत केवळ १८० सीडी पाहून त्यातील बहुतेक व्हिडीओंना मान्यता दिली आहे. त्यामध्ये राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार, तसेच अपक्षांच्याही व्हिडीओंचा समावेश आहे. (प्रतिनिधी)