शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

मॅजिक बस संस्थेच्या वतीने ऑनलाईन राष्ट्रीय विज्ञान दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST

रांजणगाव गणपती : तालुक्यात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले असून, शिरूर तालुक्यातील ९ शाळांनी यात ...

रांजणगाव गणपती : तालुक्यात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले असून, शिरूर तालुक्यातील ९ शाळांनी यात आपला सहभाग घेतल्याचे समन्वयक उमेश साळवे व मुख्याध्यापक मारुती कदम यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शिरूर तालुक्यात मॅजिक बस फाउंडेशनच्या वतीने एकूण ७ गावांमधील २ हजार विद्यार्थ्यांकरिता विविध उपक्रमांनी विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे समन्वयक उमेश साळवे, मुख्याध्यापक मारुती कदम,रतन गावडे, अनिल शिंदे, विलास धामणे, भाऊसाहेब गवळी, रंजना वाखारे, अर्जुन चव्हाण, विलास जासूद आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून मॅजिक बस संस्थेच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस, विविध प्रकल्प, निबंध स्पर्धा, विज्ञान पोस्टर इ. उपक्रम घेण्यात आल्याचे भांबर्डे (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारुती कदम यांनी दिली. यामध्ये भांबर्डे, कान्हूर मेसाई, टाकळी हाजी, अण्णापूर, रामलिंग, सरदवाडी, कारेगाव या गावांतील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड, जिज्ञासा, कुतूहल निर्माण व्हावे, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे, यासाठी हा दिवस साजरा केला.

.

शाळेत दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत विज्ञान- परिसर अभ्यास विषयात आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला हा घटक प्रभावीपणे शिकवताना तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून शिक्षकांनी ‘एक्सप्लोअर फोर मर्ज क्यूब’ या मोबाईलचा कल्पकतेचा वापर केला. यामुळे सूर्य, बुध ,शुक्र,शनी, पृथ्वी ,मंगळ ग्रहांचा वर्गात प्रत्यक्ष थ्रीडी सूर्यमालाच विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली, असे सागर म्हस्के या भांबर्डे शाळेतील विद्यार्थ्यांने सांगितले.

मॅजिक बस फाउंडेशनचे ऋषिकेश बोऱ्हाडे,राजेंद्र पिंगळे,प्रवीण मिडगुळे,कल्याणी जाधव,किरण गव्हाणे व गणेश पवार यांनी राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पराग येवले यांनी केले व आभार रवींद्र शेळके यांनी मानले.

२८ रांजणगाव गणपती

भांबर्डे शाळेतील सागर म्हस्के या विद्यार्थ्यांने ॲपच्या साहाय्याने आपला ऑनलाईन विज्ञान प्रकल्प सादर केला.