शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज दाखल करताना ‘आॅनलाईन’ डोकेदुखी

By admin | Updated: February 5, 2017 03:23 IST

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट असल्याने इच्छुक उमेदवारांसाठी

पुणे/यवत : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काहीशी क्लिष्ट असल्याने इच्छुक उमेदवारांसाठी ती ‘आॅनलाईन डोकेदुखी’ ठरत आहे. कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. आॅनलाईन भरण्याचा निवडणूक अर्ज, प्रतिज्ञापत्रे व सोबत द्यावी लगणारी कागदपत्रे आदी प्रक्रिया करावी लागत असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या क्लिष्ट प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी शंभर टक्केउमेदवारांनी आॅनलाईन अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, सध्या आयोगाचे संकेतस्थळ हँग होणे, नेट कनेक्शन न मिळणे, संपूर्ण अर्ज भरल्यानंतरही प्रिंट आऊटमध्ये काही रकाने रिक्त राहणे, कागदपत्रे अ‍ॅटॅच न होणे आदी अनेक अडचणी व अडथळ्यांना उमेदवारांना सामोरे जावे लागत आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असल्याने आधी उमेदवारी अर्ज दाखल करू आणि मग पक्षाच्या तिकिटाचे बघू, अशी भूमिका बहुतांश इच्छुक उमेदवारांनी घेतली आहे. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाने आॅनलाईन प्रक्रिया दिलेली आहे.उमेदवारास तब्बल ७२ पानांचा अर्ज आॅनलाईन भरून मग दाखल करायचा असल्याने इच्छुकांना इंटरनेटची माहिती असणारे लोक शोधून अर्ज भरण्यासाठी तासन्तास संगणकासमोर बसून राहावे लागत आहे.निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अनेक दाखले व कागदपत्रेदेखील आवश्यक असून, ते जमा करताना अनेकांची दमछाक होत आहे. पंचायत समितीपासून जिल्हा परिषदेपर्यंत इच्छुक उमेदवार दाखले जमा करताना दिसत आहेत.दौंड येथील पंचायत समिती कार्यालयात जाऊन याबाबतची माहिती घेत असताना अचानक एकाच वेळी तालुक्यातील प्रमुख पक्षांची मंडळी तेथे आढळून आली. त्यांनी निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया क्लिष्ट ठेवल्याने नाराजी व्यक्त केली. आज विविध पक्षांचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते आॅनलाईन अर्ज भरण्यासाठीच धडपडताना दिसत होते.आमच्या वेळी केवळ तीन पानी असलेला उमेदवारी अर्ज होता. यामुळे आतासारखी नसती धावपळ करावी लागली नाही. आताच्या क्लिष्ट प्रक्रियेमुळे सामाजिक कार्य करणारे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ते बुचकळ्यात पडत आहेत.- दौलत ठोंबरे, माजी सदस्य,पंचायत समिती दौंड निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे. आॅनलाईन दाखल करायचा अर्ज ७२ पानांचा आहे. यात नेमकी माहिती आणि आवश्यक कागदपत्रे असती तर इतका वेळ यासाठी गेला नसता. यामुळे उमेदवारांना नाहक धावपळ करावी लागते. निवडणूक आयोगाने अत्यंत अवघड प्रक्रिया राबविण्यापेक्षा ग्रामीण भागातील उमेदवारांचा विचार करून सोप्या पद्धतीने अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबविणे आवश्यक होते.- वैशाली नागवडे, अध्यक्षा, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसउमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक शपथपत्रे उमेदवारास देणे गरजेचे आहे. यात निवडणूक आयोगाने सर्व मिळून एकच शपथपत्र घेतले असते तर आता करावी लागणारी नसती धावपळ कमी झाली असती. आॅनलाईनमुळे वेळ वाचण्यापेक्षा उलट आता यातच तीन ते चार दिवस जात आहेत.- हरिभाऊ ठोंबरे, माजी संचालक, भीमा-पाटस कारखाना