शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, दूध रस्त्यावर ओतले

By admin | Updated: May 28, 2016 04:19 IST

पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. कांदा व दुधाचे भाव घसरल्याने कांदे

मंचर : पुणे-नाशिक महामार्गावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंना रांगा लागल्या होत्या. कांदा व दुधाचे भाव घसरल्याने कांदे व दूध रस्त्यावर ओतून निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घातल्या होत्या. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा रास्ता रोको करण्यात आले. बैलगाडा शर्यत सुरू करा, अशा घोषणाही शेतकऱ्यांनी या वेळी दिल्या.दिलीप वळसे-पाटील यांनी यावेळी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टिका केली. शेतकरी टिकला, तरच देश चालेल. मात्र, केंद्रातील मोदी व राज्य सरकार हे शेतकरी व ग्रामीण भागाच्या विरोधातील सरकार आहे. हे सरकार लायक नसून सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा त्यांनी निषेध सभेत दिला. ते म्हणाले, ‘‘अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारचा दोन वर्षांचा प्रवास पाहिला तर फक्त ठराविक उद्योगपतींना अच्छे दिन आले असून, सर्वसामान्य माणसांचे मात्र कंबरडे मोडले आहे. हे सरकार ग्रामीण भागाच्या विरोधातील सरकार आहे. शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारविरोधात संघर्ष करण्याची तयारी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी ठेवावी.’’ या वेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग भय्या पाचुंदकर, राष्ट्रवादीचे जिल्हा सचिव शरद शिंदे, प्रभाकर बांगर, राहुल पडवळ, संदीप थोरात, राजू बेंडे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. रमेश खिलारी यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)राज्याचे मुख्यमंत्री स्वतंत्र विदर्भाला पाठिंबा देतात. त्यांना मुख्यमंत्री म्हणून राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पद सोडून दिले पाहिजे. महाराष्ट्र उद्ध्वस्त करून गुजरात वाढविण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहेत. सरकारला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल.- दिलीप वळसे-पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष