शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर पाडल्यानंतर घरही पाडण्याच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घरावर बसविलेल्या मोबाईल टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : घरावर बसविलेल्या मोबाईल टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने नगरसेवकपदाचा गैरवापर करून महापालिकेत अर्ज करून टॉवर पाडायला लावला. तसेच घरदेखील पाडून टाकणार अशी धमकी दिल्याने दत्तवाडीमधील संजय रमेश रिठे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी भाजपचे नगरसेवक आनंद रमेश रिठे (रा. साई मंदिराजवळ, दत्तवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संजय महादेव सुर्वे (वय ५३, रा. महादेव बिल्डिंग, दत्तवाडी) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा शशांक संजय सुर्वे (वय २६) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार एप्रिल २०२१ पासून २१ जून २१पर्यंत सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सुर्वे यांनी आपल्या दत्तवाडी येथील महादेव बिल्डिंगच्या टेरेसवर मोबाईल कंपनीचा नवीन टॉवर बसविला होता. ते दत्तवाडी प्रभाग क्रमांक २९ मध्ये रहात असताना त्याबाबत दत्तवाडी प्रभाग क्रमांक ३० चे विद्यमान नगरसेवक आनंद रिठे यांनी महानगर पालिकेकडून टॉवर काढून न टाकण्याच्या बदल्यात पैसे मागितले होते. सुर्वे यांनी पैसे न दिल्याने रिठे यांनी महापालिकेत अर्ज करुन त्यांच्या नगरसेवक पदाचा गैरवापर करुन १० जून रोजी त्यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवरील मोबाईल टॉवर महापालिकेचे अधिकारी व कमृचारी यांचा फौजफाटा आणून काढून टाकला. तसेच टॉवरनंतर त्यांचे राहते घरदेखील पाडून टाकणार आहे, अशी धमकी देऊन आनंद रिठे यांनी संजय सुर्वे यांनी मानसिक त्रास दिला. रिठे यांच्या वारंवारच्या त्रासाला कंटाळून व टेरेसवरील मोबाईल टॉवर काढल्याने त्यांना मानहानी सहन झाली नाही. तसेच घर पाडण्याच्या चिंतेने संजय सुर्वे यांनी सोमवारी त्यांच्या इमारतीमधील पौर्णिमा सायकल नावाचे सायकल दुरुस्तीच्या दुकानाच्या छताचा दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय सुर्वे यांनी आनंद रिठे यांनी मानसिक व आर्थिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास भाग पाडले, अशी शशांक सुर्वे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.