शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला

By admin | Updated: October 7, 2016 03:15 IST

एकतर्फी प्रेमामधून माथेफिरू तरुणाने आठ ते दहा साथीदारांसह २० वर्षीय तरुणीवर हल्ला करीत मारहाण केल्याची घटना सिम्बायोसिस महाविद्यालयासमोर

पुणे : एकतर्फी प्रेमामधून माथेफिरू तरुणाने आठ ते दहा साथीदारांसह २० वर्षीय तरुणीवर हल्ला करीत मारहाण केल्याची घटना सिम्बायोसिस महाविद्यालयासमोर घडला. मैत्रिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या दोन मैत्रिणींनाही या टोळक्याने मारहाण केली. संबंधित तरुणीला अक्षरश: रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सागर कुमार अलकुंटे (रा. हडपसर) याच्यासह त्याच्या आठ ते दहा साथीदारांवर विनयभंग, तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तरुणी सिम्बायोसिस महाविद्यालयामध्ये बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षाला शिकत आहे. आरोपी सागरशी तिची ओळख एका मित्राच्या माध्यमातूनच झाली होती. आरोपीने तेव्हा पीडित मुलीला तोही सिम्बायोसिसमध्येच शिकत असल्याचे सांगितले होते. परंतु, तो सिम्बायोसिसचा विद्यार्थी नसल्याचे तिला समजले. दरम्यान, सागरने तिच्याकडे लग्नाची मागणी घालत प्रेम असल्याचे सांगितले होते. गोंधळ पाहून महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक घटनास्थळी धावल्यावर हे टोळके तेथून पसार झाले. पोलिसांना प्रकाराची माहिती कळवण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. टोळक्याचे कृत्य : मैत्रिणीलाही मारहाण४पीडित मुलीने त्याला नकार देत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिच्या नकारामुळे सागरच्या मनात राग धुमसत होता. त्यानंतरही त्याने तिला फोन व मेसेज करणे सुरूच ठेवले होते. सतत तिचा पाठलाग करीत असलेल्या सागरशी ती बोलायचे टाळत होती. त्याचा फोनला व मेसेजला उत्तरे मिळत नसल्यामुळे त्याने तिला एकटी गाठण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी परीक्षा असल्याने पीडित मुलगी महाविद्यालयामध्ये आली होती. ४पेपर दिल्यानंतर घरी जाण्यासाठी दोन मैत्रिणींसह ती महाविद्यालयाबाहेर आली. त्या वेळी सागर त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह तेथे आला. सर्वांनी मिळून तिला मारहाण करायला सुरुवात केली. सागरने तिच्या हाताला धरून ओढायला सुरुवात केली. दरम्यान, तिच्या मैत्रिणी मध्ये आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.