शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वादातून एकाचा खून करणार्‍यास अटक

By admin | Updated: May 19, 2014 00:38 IST

जुन्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करीत त्यातील एका ज्येष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरारी आरोपीस हिंजवडी पोलिसांनी अटक केली.

पुणे : जुन्या वादातून एका कुटुंबाला मारहाण करीत त्यातील एका ज्येष्ठाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरारी आरोपीस हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सुरदेव रमेश नानावत ऊर्फ सौरदेव सिलोन नानावत (वय २१, रा. घोटावडे, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बबिताबाई लक्ष्मण मारवाडी कुंभार (वय ५८, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांचे पती लक्ष्मण अंतरीया मारवाडी कुंभार (वय ६५) यांचा आरोपींनी ५ मार्च रोजी मुळशी गावच्या हद्दीत लोखंडी पाईपने मारहाण करून खून केला होता. या गुन्ह्यात यापूर्वी आरोपीचे वडील सिलोन आणि भाऊ सुनील या दोघांना अटक केली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. जागेच्या वादातून आरोपी आणि त्यांचा मेहुणा यांनी लक्ष्मण कुंभार यांना लोखंडी पाईप आणि बांबूने मारहाण केली. या वेळी मध्ये गेलेल्या फिर्यादी आणि त्यांचा मुलगा हिरो (वय ४०) यांनाही आरोपींनी मारहाण केली होती. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते, तर लक्ष्मण कुंभार यांचा घटनेनंतर उपचारादरम्यान दहा दिवसांनी मृत्यू झाला होता. घटनेनंतर अटक आरोपी फरार होता. त्यास तळेगाव दाभाडे पोलिसांनी अन्य एका गुन्ह्यात अटक केली असता त्याच्याकडून हा गुन्हा समोर आला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीच्या मेहुण्याचा शोध घेणे, गुन्ह्यात वापरलेला गज जप्त करणे आणि फरार झाल्यानंतर आरोपी कोठे होता, याबाबत तपास करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकील राजेंद्र सूर्यवंशी यांनी मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली. (प्रतिनिधी)