शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नदी सुधार योजनेच्या निविदेला एका महिन्याची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:08 IST

पुणे : मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या (जायका) निविदा प्रक्रियेला एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही ...

पुणे : मुळा-मुठा नदी सुधारणेसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाच्या (जायका) निविदा प्रक्रियेला एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली असून आतापर्यंत जवळपास १७ कंपन्यांनी निविदा संच नेले आहेत. तब्बल १ हजार २३५ कोटींच्या या प्रकल्पाच्या निविदेला यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आलेली होती.

या योजनेसाठी १ मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या निविदांसाठी ३० एप्रिलची मुदत देण्यात आली होती. कोरोनाच्या तडाख्यात शहर अडकल्याने तसेच लॉकडाऊनमुळे इच्छुक कंपन्यांनी निविदेची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकेने ३१ मे पर्यंत मुदत वाढविली होती. या कालावधीतही लॉकडाऊन असल्याने अनेक कंपन्यांना आवश्‍यक कागदपत्रे जमा करता आली नाहीत. त्यामुळे पालिकेने पुन्हा ३० दिवसांची मुदत वाढवून दिली आहे.

---------------

पालिकेच्या या योजनेला केंद्र शासनाने २०१६ साली मान्यता दिली. ही योजना पाच वर्षात अर्थात २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, सल्लागार नेमण्यास दोन वर्षे लागली. चढ्या भावाने आलेल्या निविदा आणि या निविदांवरून उभा राहिलेला गोंधळ निस्तारण्यात आणखी दोन वर्षे गेली. यामुळे योजनेचा खर्च ९९१ कोटी रुपयांवरून वाढून १२३५ कोटींवर गेला. तर, १५ वर्षांच्या देखभालीसाठी आणखी ३०० कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे.