शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भुसार बाजारात ट्रकच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:12 IST

पुणे : मार्केटयार्डातील भुसार बाजारात ट्रकच्या चाकाखाली सापडून ट्रकचालकाचा सहकारी क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात मार्केट यार्ड ...

पुणे : मार्केटयार्डातील भुसार बाजारात ट्रकच्या चाकाखाली सापडून ट्रकचालकाचा सहकारी क्लिनरचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शामलाल सुकराम सोलंकी (रा. भामासर, बिकानेर, जि. राजस्थान) असे मृत्युमुखी पडलेल्या क्लिनरचे नाव आहे. ट्रकचालक रामदयाल सीताराम सारंग (वय ३५, रा. भामासर, बिकानेर, जि. राजस्थान) याला अटक करण्यात आली. धीरज कसबे याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात राजस्थानाहून भुसार माल घेऊन शनिवारी दुपारी ट्रक आला होता. भुसार बाजारातील पेढीवर ट्रकमधील माल उतरविण्यात येणार होता. त्या वेळी ट्रकचालक सारंग ट्रकमागे घेत होत होता. ट्रकमधील क्लिनर सोलंकी ट्रकचालक सारंगला ट्रक मागे घेण्याबाबत सूचना देत होता.

त्या वेळी त्याने ट्रक थांबविण्याचा इशारा केला. ट्रकचालक सारंगने दुर्लक्ष करून ट्रकमागे नेला. त्यावेळी ट्रकच्या चाकाखाली सोलंकी सापडून त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.