शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एकाने केली थेट लेफ्टनंट कर्नलच्या बंगल्यात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 14:15 IST

चिंचोलीतील धक्कादायक प्रकार

ठळक मुद्देबंद गेटमधून उडी मारून केला बंगल्यात प्रवेश

पिंपरी: पिंपरीत दिवसेंदिवस चोरी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अशातच एकाने धाडस करून थेट लेफ्टनंट कर्नलच्या बंगल्यात चोरी केली आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली येथे मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

प्रशांत तुकाराम जानराव (वय ३९, रा. कासारसाई), असे आरोपीचे नाव आहे. सैन्य दलात सुभेदार म्हणून कार्यरत असलेले भगवान नंदराम यादव (वय ४९, रा. चिंचोली) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. १४) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नगर, चिंचोली येथे लेफ्टनंट कर्नल अरुण प्रकाश यांचा बंगला आहे. जानराव याने बंगल्याच्या बंद गेटमधून उडी मारून बंगल्यात प्रवेश केला. हाॅलमधील टेबलावर ठेवलेल्या पाकिटातील ५०० रुपये चोरून निघून गेला. ही बाब निदर्शनास आल्यानंतर यादव यांनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्टाफच्या मदतीने शोध घेऊन आरोपीला पकडले आहे. त्याला अटक करून वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केली. पोलीस हवालदार अभि बनसोडे पुढील तपास करत आहेत.