शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

एकाचा निर्घृण खून

By admin | Updated: March 9, 2017 04:10 IST

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा लोखंडी टॉमी व दगडाच्या साहाय्याने निर्घृणपणे खून करण्यात

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी गावच्या हद्दीत अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा लोखंडी टॉमी व दगडाच्या साहाय्याने निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी दयानंद बाबासाहेब लिमकर (उस्मनाबाद) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना मंगळवार (७ मार्च) रोजी हीरोहोंडा कंपनीची दुचाकी (एमएच ४२ डब्ल्यू ३९४६) पडलेली दिसली. अपघात झाल्याचा संशय आल्याने ते थांबले. त्याचवेळी त्यांना फाटकाचे आत फाटकाकडे तोंड करून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच १४ बीए ९७९) उभी असलेली दिसली. लिमकर यांनी आपली दुचाकी त्या दिशेने वळवली तेव्हा त्यांना आपल्या दुचाकीच्या उजेडामुळे ३० ते ३५ वर्षे वयाचा एक इसम डोक्यास मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत खाली पडलेला दिसला. त्याचे अंगात पांढरा शर्ट व निळी जिन पॅन्ट घातलेली होती.तेथे अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयाचे तीन इसम उभे होते. काही वेळाने लोखंडी रॉड हातात असलेला इसम फाटकातून पळत दुचाकीकडे आला त्याने चालू असलेला इंडिकेटर बंद केला व दुचाकी ओढत महामार्गाच्या खाली आणून टाकली. तो लिमकर यांच्यादिशेने धावत येऊ लागला. यामुळे ते घाबरले व तेथून निघून येऊन गुऱ्हाळात येऊन झोपले. तत्पूर्वी त्यांनी सदर बाब पोलिसांना कळवावी म्हणून १०० नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अनेक वेळा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.सकाळी त्यांनी पोलिसांना रात्री घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)