शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमापोटी दीड वर्ष वीजबिल खिशातून

By admin | Updated: May 29, 2016 03:42 IST

आपल्या गावातील शाळा राज्यात आदर्श असल्याचा अभिमान बाळगताना गावातील रघुनाथ शंकर कर्डिले या ग्रामस्थाने कर्डेलवाडी जि. प. शाळेला सर्वोतोपरी मदत करण्याचा ध्यास घेतला.

शिरूर : आपल्या गावातील शाळा राज्यात आदर्श असल्याचा अभिमान बाळगताना गावातील रघुनाथ शंकर कर्डिले या ग्रामस्थाने कर्डेलवाडी जि. प. शाळेला सर्वोतोपरी मदत करण्याचा ध्यास घेतला. शाळेच्या प्रेमापोटी कर्डिले कुटुंबीय गेल्या दीड वर्षापासून शाळेचे वीजबिल स्वत: भरत आहेत. शाळेच्या डिजिटल उपक्रमासाठी शाळेला एलसीडीही त्यांनी भेट दिला आहे.वर्षाचे ३६५ दिवस सुरू असणाऱ्या व गुणवत्तेबाबत राज्यच नव्हे, तर देशपातळीवर चमकलेल्या कर्डेलवाडी शाळेचे कौतुक सर्वांनाच आहे. अशात ज्या गावात शाळा आहे, त्या गावाच्या ग्रामस्थांना कौतुक नसेल तर नवलच. या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सकट व राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त सहशिक्षिका बेबीनंदा सकट यांनी शाळेत व विद्यार्थ्यांत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे ग्रामस्थ; तसेच पालकवर्ग शाळेला मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. जि. प. शाळांना व्यावसायिक दराने वीजबिल आकारणी केली जात आहे. शासनाकडून वीजबिलासाठी काहीच तरतूद केली जात नाही. कर्डेलवाडी शाळेच्या मदतीमुळे प्रभावित झालेल्या कर्डिले यांनी मात्र या शाळेला या त्रासापासून मुक्त केले. दीड वर्षांपासून कर्डिले हे शाळेचे वीजबिल भरत आहेत. यासाठी त्यांचे आतापर्यंत ६० हजार रुपये खर्च झाले आहेत. दगडखाण कामगारांचीही मदत- शासनाकडून जि. प. शाळांना वर्षाला ठराविक रक्कम मिळते. या रकमेतून सर्व खर्च भागवणे शक्य होत नाही. - अशात सकट यांनी लोकसहभागाला प्राधान्य दिले. यातच सकट दाम्पत्याने वेळोवेळी शाळेसाठी स्वनिधीचा उपयोगही केला. - आज यामुळे या शाळेत वर्गांमध्ये पंखे, प्रकाशयोजना, संगणक, एलसीडी प्रोजेक्ट, टेलिव्हीजन संच, एलसीडी, लायब्ररी, जलशुद्धीकरण यंत्रणा, स्वत:ची विंधनविहीर, रेफ्रिजरेटर यासह विविध साहित्य उपलब्ध आहे. - या शाळेत दगडखाण कामगारांची मुले असून, दगडखाण कामगारांनी आपल्या मुलांमधील वाढलेली गुणवत्ता पाहून शाळेला ५५ हजार रुपयांचा एलसीडी भेट दिला आहे.