उन्हाळ्याची सुरुवात होत असताना उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पक्ष्यांना अन्नासाठी भटकंती करताना दमछाक होते, त्यामध्ये अनेक पक्ष्यांचा जीवही जातो. त्यामुळे भूतदया दाखवत त्यांनी थेट एक एकर ज्वारीचे पीक पक्ष्यांसाठी राखीव ठेवली.
वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेसाठी भरीव कामगिरी करणारे शेरखान शेख यांच्या शेतात कायमच ज्वारीच्या पिकावर बसलेल्या असंख्य पक्षी दिसतात. मात्र त्यांना उडविण्यासाठी ना बुजगावणे आहेत ना गोफनीचा प्रयोग केला जातो. यंदाची ज्वारी पक्ष्यांसाठी ठेवायची ही संकल्पना शेरखान यांचे वडील सिकंदर यांनी त्यांना सांगितली. त्यानंतर एका क्षणाचा विचार न करता शेरखान यांनी पक्ष्यांसाठी ज्वारी मुक्त केली.
--
फोटो क्रमांक-२९ शिक्रापूर पक्ष्यांसाठी राखीव शेत.
फोटो - शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पक्ष्यांसाठी राखून ठेवलेले ज्वारीचे पीक दाखवताना प्रगतशील शेतकरी सिकंदर शेख.
--